Header Ads

 • Breaking News

  संगमनेरात थोरात गटाचे वर्चस्व कायम

  संगमनेर । DNA Live24 - संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांचा करिष्मा कायम राहिला. तर राधाकृष्ण विखेंना जोर्वे गटात चांगलाच धक्का बसला. संगमनेर तालुक्यात अपेक्षेप्रमाणे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाने बाजी मारली. संगमनेरचे मिनी मंत्रालयदेखील बहुमताने आपल्या ताब्यात ठेवण्यात त्यांना यश आले आहे.

  शिवसेनेने पंचायत समितीत दोन तर राष्ट्रवादी कॉग्रेसने एका जागेवर विजय मिळविला. चुरशीच्या ठरलेल्या आश्वीतुन विखे समर्थक कॉग्रेसकडून तर जोर्व्यामध्ये थोरात समर्थक शेतकरी विकास मंडळाकडून विजयी झाले. पालकमंत्री राम शिंदे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमध्ये यावेळी थेट लक्ष घातले होते. विखे आणि थोरात या स्वपक्षातील दोन नेत्यांची प्रचारादरम्यान एकमेकांविरोधात रंगलेली जुगलबंदी देखील राज्याने अनुभवली. पंचायत समितीतील एका विजयाने पालकमंत्र्यांची लाज राखली गेली. अन्यथा संगमनेर तालुक्यात भाजपला खाते खोलणेही मुश्किल झाले होते. 

  असे आहेत निकाल - 
  जिल्हा परिषद : एकूण गट ०९ - 
  पक्ष - विजयी उमेदवार - मागील जागा 
  (२०१७) - (२०१२) 
  राष्ट्रवादी - ०१ - ०२
  काँग्रेस - १२ - १४
  शिवसेना - ०२ - ००
  भाजप - ०१ - ००
  शेविमं - ०२ - ००

  पंचायत समिती : एकूण गण १८ 
  पक्ष - विजयी उमेदवार - मागील जागा 
  (२०१७) - (२०१२) 
  राष्ट्रवादी - ०० - ०१
  काँग्रेस - ०८ - ०७
  शिवसेना - ०० - ००
  भाजप - ०० - ००
  शेविमं - ०१ -००

  Post Top Ad

  Post Bottom Ad