728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

पारंपारिक नृत्य-संगीतावर आधारित फोक फिटनेस उपयुक्त - जाधव

अहमदनगर । DNA Live24 - युवकांना नव्हे तर सर्वांना उपयुक्त असा फोक फिटनेसचा नवा अविष्कार आनंददायी आहे. याद्वारे आरोग्य उत्तम राखता येईल. त्यासाठी भारतीय पारंपारिक नृत्य व संगीतावर आधारित फोक फिटनेस सर्वांसाठी उपयुक्त आहे, असे मत माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.

बंधन लॅान येथे फिटनेस अॅण्ड बॉलरूम डान्स स्टुडिओच्या फोक फिटनेसचा शानदार शुभारंभ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अनिल बोरुडे, गणेश कवडे, आरती पांडे, सुदाम देशमुख, प्रदीप बोरुडे, निलेश वैकर, रवी गोहेर, सुमित गोहेर उपस्थित होते. यावेळी आरती पांडे म्हणाल्या ,पाश्चिमात्य संगीत व नृत्यावर आधारित झुम्बा, सालसाचे आकर्षण वाढत असताना त्यापेक्षाही जास्त परिणामकारक भारतीय पारंपारिक नृत्य व संगीत आहे.

देशातील पारंपारिक १२२ फोक नृत्यांची सांगड घालून नविन फोक फिटनेसचा वापर ४५ मिनिटे केल्यास एक हजार कॅलरीज बर्न होऊ शकतात. पारंपारिक नृत्य संगीताचे महत्व ओळखून त्याला नविन रुपात व आधुनिक स्वरुपात फोक फिटनेसद्वारे करण्यात आले आहे. तसेच आपली नृत्ये अत्यंत सोपी व साधी असून सर्वांना ती जमू शकतात. गरबा, भांगडा, कोळी, शेतकरी, आसामी अशा विविध नृत्यांवर आधारित फोक फिटनेस पुणे, मुंबई, दिल्लीत लोकप्रिय झाले अाहेे.

प्रास्ताविकात सुमित गोहेर यांनी केले. कोणत्याही वयाची व्यक्ती यात सहभागी होऊन स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ राखू शकते, असे ते म्हणाले. या उपक्रमासाठी धनजंय जाधव, सचिन भुतारे, निलेश वैकर, रवी गोहरे, प्रशांत रेखी, अशोक देसर्डा, प्रीतम बागवानी यांचे सहकार्य लाभले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: पारंपारिक नृत्य-संगीतावर आधारित फोक फिटनेस उपयुक्त - जाधव Rating: 5 Reviewed By: DNA Live24