Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, २२ मार्च, २०१७

आ. संग्राम जगताप, राहुल जगताप, वैभव पिचड निलंबित

मुंबई । DNA Live24 - अर्थसंकल्पादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेसच्या 9 आणि राष्ट्रवादीच्या 10 आमदारांचा समावेश आहे. निलंबित आमदारांमध्ये नगर जिल्ह्यातील संग्राम जगताप, राहुल जगताप व वैभव पिचड या तीन आमदारांचा समावेश आहे.

या सर्व आमदारांच 31 डिसेंबर २०१७ पर्यन्त निलंबन करण्याचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिला. तो मान्य करण्यात आला. निलंबित केल्यामुळे या आमदारांना पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनाला हजर राहता येणार नाही.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता.

सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे  असे आरोप ठेवून या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

गैर काहीच नाही -  शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मागण्यात गैर काहीच नाहीय. सरकारच्या दडपशाहीला न घाबरता कर्जमाफीसाठी आमचा लढा चालूच राहिल, अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीचे आमदार असून त्यांनीही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी विधिमंडळात आग्रही भूमिका घेतली होती.

अावाज दडपण्याचा प्रकार - आम्ही शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. कारण, शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या वतीने आम्ही आवाज उठवला, मात्र आमच्यावरच कारवाई झाली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

हे आहेत निलंबित आमदार 

काँग्रेस
अमर काळे – काँग्रेस,  आर्वी मतदारसंघ, वर्धा
विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर
हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा
अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद
डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर
संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे
अमित झनक – काँग्रेस, रिसोड, वाशिम
कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण
जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा

राष्ट्रवादी काँग्रेस

भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी
जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे
मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी
संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर
अवधूत तटकरे – राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड
दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण – सातारा
नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस  दिंडोरी, नाशिक
वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर
राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर
दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages