Header Ads

 • Breaking News

  पैशाच्या वादातून भिंगारमध्ये युवकाचा मर्डर !

  नगर । DNA Live24 - विकत घेतलेली मोटारसायकल पसंत नसल्याने पैसे परत मागणाऱ्या शेखर देविदास गायकवाड या १९ वर्षीय युवकाचा बुधवारी रात्री भिंगारमध्ये निर्घुण खून करण्यात आला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तातडीने शुभम रमेश कांबळे व रोहित शाम कांबळे (रा. भिंगार) या दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

  बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सदर बाजार परिसरात हा प्रकार घडला. या घटनेने भिंगार परिसरात तणाव निर्माण झाला होता. शेखरने शुभम व रोहित यांच्याकडून काही दिवसांपूर्वी एक मोटारसायकल विकत घेतली होती. त्यातील काही पैसे शेखरने दिले. परंतु त्याला मोटारसायकल पसंत नसल्याने मोटारसायकल मागे घेऊन पैसे परत देण्याची मागणी त्याने केली होती. यावरूनच खरा वाद निर्माण झाला.

  सदर बाजारात सुरुवातीला या युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर नंतर भांडणात झाले. यावेळी आरोपींनी शेखरला चाकूने भोसकले. तसेच त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात आणलेल्या शेखरचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.

  या घटनेची खबर मिळाल्यावर सहायक पोलिस अधीक्षक तथा शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक चिन्मय पंडित, यांच्यासह भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेने भिंगारमध्ये खळबळ माजली असून, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad