Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

मंगळवार, २१ मार्च, २०१७

Live Updates : झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक


अहमदनगर । DNA Live24 -  Live Updates ! 

4:45 PM : जि. प. च्या नूतन अध्यक्ष विखे व उपाध्यक्ष घुले यांची पत्रकार परिषद..

4:30 PM : नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार..

4:10 PM : जि. प. उपाध्यक्षपदी राजश्री घुले (राष्ट्रवादी) विजयी घोषित..

4:06 PM : नगर जिल्हा परिषदेत महिला राज.. शालिनीताई विखे अध्यक्ष, तर राजश्री घुले उपाध्यक्ष.

4:02 PM : राष्ट्रवादीच्या राजश्री घुले होणार जि. प. च्या उपाध्यक्ष..

4:00 PM : राष्ट्रवादीच्या राजश्री घुलेंना ५१ मते. विजयाची औपचारिक घोषणा बाकी..

3:58 PM : कोणाचाही अर्ज माघारी नाही. उपाध्यक्षपदासाठी घुले व शेळके यांच्यात लढत..

3:55 PM : उपाध्यक्षपदाच्या लढतीतून अर्ज माघारी घेतला नाही, तर होणार लढत..

3:50 PM : उपाध्यक्षपदाच्या लढतीतून अद्याप कोणाचाही अर्ज माघारी नाही..

3:48 PM : उपाध्यक्षपदाचा अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत..

3:45 PM : उपाध्यक्षपदासाठी राजश्री घुले (राष्ट्रवादी) व दादासाहेब शेळके (क्रांतीकारी शेतकरी पक्ष) यांच्यात लढत

3:42 PM : जि. प. उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू..

3:41 PM : शालिनीताई विखे विजयी जाहीर..

3:40 PM : शालिनीताई विखे यांना ५२ मते.. तिसऱ्यांदा झाल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष.

3:36 PM : अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनीताई विखेंची निवड. फक्त औपचारिक घोषणा बाकी.

3:35 PM : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत श्रीरामपूरची महाआघाडीही काँग्रेससोबत..

3:30 PM : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डावी आघाडीही काँग्रेससोबत..

3:27 PM : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना काँग्रेससोबत..

3:25 PM : भाजपचे उमेदवार सदाआण्णा पाचपुते यांना १९ मते..

3:22 PM : अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जि. प. सदस्य हात वर करुन करणार मतदान..

3:20 PM : अध्यक्षपदासाठी विखे व पाचपुते यांच्यात लढत सुरू..

3:19 PM : अध्यक्षपदासाठी शालिनीताई विखे व सदाआण्णा पाचपुते यांच्यात होणार निवडणुक..

3:18 PM : अर्ज माघारी न घेतल्याने अध्यक्षपदासाठी होणार हात वर करुन मतदान..

3:15 PM : दहा मिनिटे होऊनही अद्याप कोणीही अर्ज माघारी घेतलेला नाही...

3:11 PM : दोन्हीपैकी एकाने अर्ज माघारी घेतल्यास बिनविरोध अध्यक्ष होणार..

3:10 PM : अध्यक्षपदाच्या अर्ज माघारीसाठी दिला १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ..

3:07 PM : शालिनीताई विखे व सदाआण्णा पाचपुते यांच्या अध्यक्षपदाची नामनिर्देशनपत्रे वैध..

3:05 PM : जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अनिल कवडे यांनी केली निवडणुक प्रक्रिया सुरू..

3:00 PM : काही क्षणांतच अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला सुरुवात..

2:59 PM : शिवसेनेच्या भाग्यश्री मोकाटे पांगरमल दारुकांड प्रकरणात आहेत आरोपी. गुन्हा दाखल झाल्यापासून आहेत फरार..

2:58 PM : शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्या भाग्यश्री मोकाटे अद्यापही सभागृहात गैरहजर..

2:55 PM : अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला थोड्याच वेळात होईल सुरुवात..

2:52 PM : भाजप गटनेते वाकचौरे यांनी पाचपुते व शेळके यांना मतदान करण्याचा व्हीप बजावला..

2:50 PM : भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी व्हीप बजावला..

2:45 PM : निवडणुक प्रक्रियेसाठी नवनिर्वाचित सदस्य छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दाखल..

2:40 PM : अध्यक्षपदासाठी शालिनीताई विखे (काँग्रेस) व सदाआण्णा पाचपुते (भाजप), तर उपाध्यक्षपदासाठी राजश्री घुले (राष्ट्रवादी) व दादासाहेब शेळके  (क्रांतीकारी शेतकरी पक्ष) यांच्यात होईल लढत..

2:35 PM : अर्ज माघारी घेतले नाही, तर ३ वाजेला होईल निवडणुक प्रक्रिया सुरू..

2:30 PM : अद्याप एकही अर्ज माघारी घेतलेला नाही..

1:30 PM : अर्जांची छाननी झाली सुरू, त्यानंतर अर्ज माघारीसाठी दिला जाईल वेळ..

1:10 PM : पदाधिकारी निवडीसाठी ३ वाजता होणार मतदान, राजकीय घडामोडींना प्रचंड वेग..

1:00 PM : निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली..

12:45 PM : आत्तापर्यंत : अध्यक्षपदासाठी शालिनीताई विखे (काँग्रेस) व सदाआण्णा पाचपुते (भाजप) तर उपाध्यक्षपदासाठी राजश्री घुले (राष्ट्रवादी) व दादासाहेब शेळके  (क्रांतीकारी शेतकरी पक्ष) यांचे अर्ज दाखल.

12:40 PM : क्रांतीकारी शेतकरी पक्षातर्फे उपाध्यक्षपदासाठी दादासाहेब शेळके यांचा अर्ज दाखल. सदस्य सुनिल गडाख यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल.

12:35 PM : पाचपुते यांच्या रुपात भाजपचा पहिला अर्ज दाखल.

12:30 PM : भाजपकडून श्रीगोंद्याचे नेते सदाशिवअण्णा पाचपुते यांचा अर्ज दाखल. जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड व सदस्य जालिंदर वाकचौरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

12:27 PM : विखे, घुले यांनी एकत्रच केले अर्ज दाखल..

12:25 PM : उपाध्यक्षपदासाठी राजश्री घुले यांचाही अर्ज दाखल..

12:20 PM : अध्यक्षपदासाठी शालिनीताई विखे यांचा अर्ज दाखल..

12:10 PM : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुलेही हॉटेल राज पॅलेसवर दाखल..

12:05 PM : काँग्रेस-राष्ट्रवादीची हॉटेल राज पॅलेसवर बैठक सुरू. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेही दाखल...

12:01 PM : बाळासाहेब थाेरातांकडून काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची ओळख परेड..

11:55 AM : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अखेरची बैठक समाप्त. अध्यक्षपदी शालिनीताई विखे, उपाध्यक्षपदी राजश्री घुले यांच्या नावावर होऊ शकते शिक्कामोर्तब..

11:50 AM : शिवसेनेनेही नेले चार अर्ज, सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता..

11:45 AM : काँग्रेसतर्फे बाबासाहेब दिघे, राजेश परजणे, राजेंद्र लहरी यांनी नेले अर्ज..

11:40 AM : सभागृहात गोंधळ नको म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले..

11:30 AM : अध्यक्षपदासाठी क्रांतीकारी शेतकरी पक्षातर्फे सुनिल गडाख यांनी नेला अर्ज..

11:25 AM : राजश्री घुले यांच्या उपाध्यक्ष पदासाठी सोमनाथ धूत, राजेंद्र गुंड यांनी नेले अर्ज..

11:15 AM : पदाधिकारी निवडणुकीच्या वार्तांकनासाठी पत्रकारांनाही सभागृहात प्रवेश.

11:10 AM : जिल्हाधिकारी अनिल कवडे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, अरुण आनंदकर यांनी निवडणुक कर्मचाऱ्यांना दिल्या सूचना..

11:05 AM : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरूवात..

10:55 AM : जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी सभागृहात होणार पदाधिकारी निवडणुक प्रक्रिया...

10:45 AM : नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद सज्ज..

10:40 AM : मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सदस्यांनी जागेवरच राहणे अपेक्षित आहे. जेणेकरुन मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना हात वर केलेल्या सदस्यांची मते मोजणे सोपे जाईल..

10:35 AM : पदाधिकारी निवडणुक प्रक्रियेचे एका स्थिर, व ४ फिरत्या कॅमेऱ्यातून होणार व्हिडिओ चित्रीकरण...

10:30 AM : जिल्हा परिषदेच्या सभागृहात निमंत्रित सदस्य व निवडणुकीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनाच असणार प्रवेश..

10:25 AM : अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत समसमान मते पडल्यास चिठ्ठीद्वारे निवड करणार..

10:20 AM : जिल्हा परिषद आवारात कडेककोट पोलिस बंदोबस्त तैनात...

10:15 AM : दुपारी बरोबर ३ वाजता जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी कामकाज सुरू करतील..

10:05 AM - दुपारी अडीच वाजेपर्यंत सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सभागृहात आसनस्थ होतील..

10:01 AM - सकाळी १० ते ११ या वेळेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज स्वीकारले जातील..


ताज्या अपडेट्ससाठी या पेजला रिफ्रेश करत रहा...

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages