Header Ads

 • Breaking News

  अभाविपने जाळला एसएफआयचा प्रतिकात्मक पुतळा

  अहमदनगर । DNA Live24 - वामपंथी विद्यार्थी संघटनेने दिल्ली विद्यापिठातील रामजस महाविद्यालयात येवून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. तसेच घोषणाबाजी केली. अभाविपने पुणे विद्यापीठात याचा निषेध केला असता त्या कार्यकर्त्यांना मारहाण शिवीगाळ करण्यात आली. याच्या निषेधार्थ नगरमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एसएफआयचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

  अभाविपच्या नगर शाखेचे वतीने उमर खालिद, शैला रशिद , व एसएफआय या विद्यार्थी संघटनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शहरातील न्यू आर्ट, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालया समोर दुपारी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेे कुमार बिजलगावकर, ओमकार कुलकर्णी, योगेश अराडे, रुद्रेश अंबुरे, तुषार रामदासी, अंकित पाचारणे, संजय होडशीळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एसएफआय संघटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad