Header Ads

 • Breaking News

  वकिलांसाठी लॉ प्रॅक्टीस सोसायटीची मागणी

  अहमदनगर । DNA Live24 - वकिलांना अद्यावत ठेवून अभ्यासाची क्षमता वाढविण्यासाठी लॉ प्रॅक्टीस इनरिचमेट सोसायटी स्थापन करण्याची मागणी राष्ट्रीय न्यायाग्रह आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या माध्यमातून वकिलांसाठी डिजीटल बार लायब्ररी उभारण्याचा संकल्प असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. न्यायाग्रह आंदोलनाच्या वतीने न्यायालयाच्या नवीन इमारती जवळ न्यायमित्र नगर उभारण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

  जिल्ह्यात लॉ प्रॅक्टीस इनरिचमेट सोसायटीची स्थापना झाल्यास वकिलांना अद्यावत ज्ञान प्राप्त होणार आहे. डिजीटलबार लायब्ररीच्या माध्यमातून उच्च व सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेल्या निकालाचा अभ्यास वकिलांना करता येणार आहे. हा निकाल विशेषत: ज्युनिअर वकिलांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या मोहिमेद्वारे कमी वेळेत अधिक प्रभावी युक्तीवाद होवून, न्यायदान प्रक्रियेत गती येणार आहे. तसेच सर्व सामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे.

  सोसायटी स्थापन करण्यासाठी अ‍ॅड. अशोक बंग यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये अ‍ॅड. पी. एम. भंडारी, अ‍ॅड. नरेश गुगळे, अ‍ॅड. व्ही. बी. म्हसे, अ‍ॅड. कारभारी गवळी, अ‍ॅड. रविंद्र बेद्रे यांचा समावेश आहे. पांगरमल विषारीदारु हत्याकांड राज्यात गाजत असताना, संघटनेच्या वतीने जिल्हा रुग्णालच्या आवारात सिव्हिल सर्जन यांचा बंगला स्थलांतर करण्याची व त्यांच्या बंगल्याच्या प्रशस्त जागेत न्यायमित्र नगर उभारण्याची मागणी मुख्यमंत्रीकडे करण्यात आली आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad