Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

सोमवार, १३ मार्च, २०१७

अहमदनगर पहिली मंडळी ( काँग्री ) चर्चचा वर्धापन दिन उत्साहात

अहमदनगर । DNA Live24 - शहराचे वैभव ह्युम मेमोरिलयल चर्च व ऐतिहासिक मंडळी अहमदनगर पहिली मंडळी ( काँग्री ) अहमदनगर या मंडळीचा 184 वा वर्धापण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त विशेष भक्ती घेण्यात आली. संचलन मंडळीचे सहाय्यक धर्मगुरु विद्यासागर भोसले यांनी केले. तर संदेश मुख्य धर्मगुरु पी. जी. मकासरे यांनी दिला. उपस्थित सर्व सभासदांना मंडळीचे सह सचिव मिलिंद भिंगारदिवे यांनी शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.

मंडळीचे सचिव जॉन्सन शेक्सपियर यांनी मडळीच्या यशस्वी कारकिर्दीची माहिती उपस्थितांना दिली. अमेरिकन मिशनरी डॉ. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि रेक्झोना नॉट हे फेब्रुवारी 1813 मध्ये मुंबईत आले. त्यांनी सामाजिक व आध्यात्मिक कार्याला सुरवात केली. 1833 साली अहमदनगर पहिली मंडळी ( काँग्री ) ची स्थापणा केली. सामाजिक व वैद्यकिय सेवे बरोबर त्यांनी लोकांना पवित्र शास्त्रातील नितीतत्वे यांचे शिक्षण दिले. पवित्र शास्त्रातील या नीतीतत्वांनी प्रभावित होत अनेकांनी ख्रिस्ती धर्माचा स्विकार केला, असे ते म्हणाले.

यावेळी अ‍ॅड. जे. डी. कुसमोडे, अ‍ॅड. सायली गुप्ता, रेव्ह. अ‍ॅड. डी. बी. कसोटे, दिलीप सोनावणे, अ‍ॅड. योहान मकासरे, गोपाल बहुरुपी पाटील. डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मुकूंद तांदळकर, अ‍ॅड. पी. व्ही. बल्लाळ, अशोक आहुजा यांनी मनोगत व्यक्त केले. हिंगणगाव मंडळी, वडगाव गुप्ता मंडळी, दहिटणे गुजाळ मंडळी, पिंपळगाव माळवी मंडळी, खंडाळा मंडळी, बुरुडगांव मंडळी, पिंपळगाव कौडा मंडळी, ध्वळपुरी मंडळी, इत्यादी मंडळीचे प्रतिनिधींचे या ठिकाणी स्वागत करुन पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळीचे कार्यकारिनी सदस्य अशोक जाधव. नंदकिशोर जाधव, सुनिल सोनावण, महेंद्र भोसले, विजय अंधारे, ऑलिवन शेक्सपियर, संतोष जाधव,अनिल अंधारे राजू शिंदे, अनिल पवार, प्रदिप कदम, शामराव भिंगारदिवे, डॅनिएल सात्राळकर, जितेंद्र पाडळे, निशा कदम, मार्गारेट जाधव, संदेश सगळगिळे, सचिन जाधव, तसेच राजेश चाबुकस्वार, शिरिष लाड, मुन्न्ना चाबुकस्वार यांनी परिश्रम घेतले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages