Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

सोमवार, १३ मार्च, २०१७

महिलांचा योग्य सन्मान व प्रशंसा होणे आवश्यक - डॉ. शालिनी उजागरे


अहमदनगर । DNA Live24 - अहमदनगर पहिली मंडळी ( काँग्री ) च्या वतीने नुकतेच महिलांच्या सनमानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य धर्मगुरु पी. जी. मकासरे यांनी प्रार्थाना करून बोधपर संदेश दिला. सहायक सचिव मिलींद भिंगारदिवे यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. मंडळीतील ज्येष्ट व कर्तृत्ववान स्त्रियांचा या वेळी मकासरे व विद्यासागर भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यकारिणी सदस्य अशोक जाधव, महेंद्र भोसले, ए. बी. जाधव, राजू शिंदे, शामराव भिंगारदिवे, सुनिल सोनवणे, निशा कदम, मार्गारेट जाधव, यांनी सर्व उपस्थित महिलानां शुभेच्छा दिल्या. प्रास्तविक मंडळीचे सचिव जॉन्सन शेक्सपियर यांनी केले. ते म्हणाले, पुरुष व महिला परमेश्‍वराची निर्मिती असून महिलानां त्यांच्या कुवती प्रमाणे व इच्छेनुसार जगण्याची संधी मिळावयास हवी.

डॉ. शालिनी उजागरे म्हणाल्या, आजची स्त्री सर्वच क्षेत्रात समर्थपणे काम करीत आहे. मदर तेरेसा, कल्पना चावला, प्रतिभाताई पाटील, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, सावित्रीबाई व इतिहासात कर्तृत्ववान असलेलया स्त्रीयांची उदाहरणे त्यांनी दिली. स्त्रीयांजवळ ज्ञानाबरोबर प्रबळ इच्छाशक्ती देखिल आहे. याच ईच्छाशक्तीमुळे त्या प्रत्येक क्षेत्रात आपलया ज्ञानाचा -आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत.

महिलांना कमी न लेखता त्यांना सन्मान दिला पाहिजे. त्यांच्या कार्याची प्रशंसा केली पाहिजे. महिलांमध्ये असलेल्या ज्ञानाप्रमाणे व कुवती नुसार त्यानां काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. यावेळी उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. अनिल अंधारे, प्रदिप कदम, ऑल्विन शेक्सपियर, अनिल पवार, विजय अंधारे, सचिन जाधव, संदेश सगळगिळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages