728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

आनंदऋृषीजी हॉस्पीटल हे गोरगरीबांचे आरोग्यमंदीर - अनिल राठोड

अहमदनगर । DNA Live24 - राज्यातील सर्वधर्मिय गोरगरीब जनतेसाठी आचार्य आनंदऋृषीजी महाराज हॉस्पीटल हे आरोग्य मंदीर ठरले आहे. वर्षातील दोन महिने या हॉस्पीटल मधून मोफत सर्वरोग निदान शिबीर राबवले जाते, या शिबिराचा फायदा सर्वसामान्य जनतेला होत असल्याचे शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी सांगितले. प्रारंभी संतोष बोथरा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दत्ता वारकड यांनी केले.

आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये आयेाजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्‌घाटन अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या शिबीराचे आयोजक कमलाबाई हस्तामलजी मुनोत निंभारीवाला हे आहेत. या कार्यक्रमास संतोष बोथरा, बाबुसेठ लोढा, माणकसेठ कटारिया, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लानी, सुमित भंडारी, शसिकांत भंडारी,नेत्रतज्न डॉ. संदिप राणे उपस्थित होते. अाभार प्रकाश छल्लानी यांनी मानले.

यावेळी राठोड म्हणाले,आचार्य आनंदऋषीजी महारजांच्या कृपार्शिवादाने अक्षयऋृषीची व महेंद्रऋृषीजींच्या प्रेरणेतून, जैन सोशल फांऊडेशनच्या सहकार्यातून विविध आजारांवर निदान करण्यासाठी सर्व प्रकारची शिबीरे आयोजित करतात. या शिबीरांचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना होत सतो. शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या पंचविस वर्षांपासून या आरोग्य मंदिराची सेवा करता आली. यावेळी अनिल राठोड यांच्या वाढदिवसा निमित्त जैन सोशल फांऊडेशन व आनंदऋृषीजी हॉल्पीटलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: आनंदऋृषीजी हॉस्पीटल हे गोरगरीबांचे आरोग्यमंदीर - अनिल राठोड Rating: 5 Reviewed By: DNA Live24