Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

रविवार, १२ मार्च, २०१७

समाजाच्या वाढीव अपेक्षांमुळे स्वयंसेवी संस्थापुढे मोठी आव्हाने - अण्णा हजारे


अहमदनगर । DNA Live24 - आगामी काळात शासनाची बदलती भूमिका, नवीन नियमावली आणि समाजाच्या वाढीव अपेक्षांमुळे स्वयंसेवी संस्थासमोर मोठी आव्हाने उभी राहणार आहेत. अशा वेळी केवळ वंचित समाजासाठी काम न करता 'वंचितांसाठी वंचितांसोबत' काम करण्याची स्नेहालयची भूमिका संस्थासाठी अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

स्नेहालयच्या वार्षिक अहवालाचे अण्णा हजारे यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर शंकर केशव आडकर बालकल्याण संकुलात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात वकील श्याम असावा, संजय पठाडे, तुळशीभाई पालीवाल, डॉक्टर प्रीती भोंबे, सुवालाल शिंगवी, सुमन त्रिभुवन, जया जोगदंड, यशवंत आणि अशोक कुरापट्टी, दीपक बुरम, संगीता शेलार, निक कॉक्स, हनीफ शेख, प्रवीण मुत्याल, बाळासाहेब वारुळे, संतोष धर्माधिकारी, उमेश नगरकर वकील, विनायक सांगळे वकील, विजय मुथा वकील, डॉक्टर सुहास घुले, डॉ. मर्सिया वॉरन, मिलिंद कुलकर्णी आदि उपस्थित होते.

अण्णा म्हणाले की, प्रामाणिकता, ध्येयनिष्ठा, पारदर्शकता, खुलेपणा, निर्णय प्रक्रियेतील सहविचार, व्यक्तीपेक्षा संस्थेला- संस्थेपेक्षा कार्याला आणि कार्यापेक्षा देश आणि व्यापक समाजहिताला स्नेहालय परिवाराने प्राधान्य दिले. त्यामुळे महाराष्ट्र बाहेर कर्नाटक राज्यातही स्नेहालयचे १७ सेवा प्रकल्प विस्तारले. समाजातील गरीब आणि वंचितांची आत्मशक्ती ओळखून आणि प्रज्वलीत करून लोकसहयोगातून विकसित झालेल्या भारतातील मोजक्या चळवळीत स्नेहालय अग्रणी आहे, असेही अण्णा म्हणाले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages