Header Ads

 • Breaking News

  नेवासाची धनुर्धारी साक्षी शितोळे भारतीय संघात

  नेवासा  । DNA Live24 - नेवाशाची धनुर्धारी खेळाडू साक्षी शितोळे हिची एशिया कप धनुर्विद्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सातारा येेथे झालेल्या ३९ व्या कुमार गट राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेतून भारतीय संघाची निवड करण्याची आर्चरी असोशियशन्स ऑफ इंडियाने जाहिर केले होते.

  राष्ट्रीय स्पर्धेतून रिकर्व्ह राऊंण्ड व कंपाऊंण्ड प्रकारात भारतीय संघासाठी दोनही प्रकारात ८ मुले व ८ मुली या प्रमाणे ३२ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्याच्यामध्ये रॉविन राऊंण्ड पद्धतीने एशिया कप ट्रायल्स घेण्यात आल्या.

  या सरावात अहमदनगर जिल्हा धनुर्धारी संघटना व स्वराज्य क्रिडा अकॅडमीची कु.साक्षी शितोळे ही रिकर्व्ह राऊंण्ड स्पर्धेसाठी पाञ ठरली. तिने अतिशय उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत अनेक अंतरराष्ट्रीय खेळाडूंवर मात करत भारतीय संघात स्थान पटकाविले.

  भारतीय संघ  दि. १९ ते २६ मार्च दरम्यान बँकॉक, थायलंड येथे होणाऱ्या एशिया कप स्पर्धेत सहभागी होणार आहे. तिला या स्पर्धेसाठी अभिजीत दळवी व सहकार्यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या निवडीबद्दल सर्वञ कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad