728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

व्यसनाधीन होणे म्हणजे आत्महत्या करणेच

अहमदनगर । DNA Live24 - आज युवा पिढी कामाचा टेंन्शन कमी करण्यासाठी दारु, गुटखा व मावा सारख्या व्यसनांच्या अधीन होत चालली आहे. त्यांना या व्यसनांचा भविष्यात होणार्‍या दुष्परिणामांची जाणिव असून,सुद्धा ते दारु पिणे गुटखा व मावा खाने बंद नाही करत म्हणजे ते एक प्रकारे आत्महत्याच करण्याचा प्रकार आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व व्यसनमुक्तीचे प्रचारक युनूस तांबटकर यांनी केले.

मखदूम सोसायटी, कर्मयोगी प्रतिष्ठान, मुस्कान सोशल असोसिएशन, अहमदनगर सोशल कल्ब, मिसगर मेडिकल फाऊंडेशन, महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, मराठा सेवा संघ व इतिहासप्रेमी मंडळाच्यावतीने युनूसभाई तांबटकर यांना डॉ. एस. टी. महाले पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार रहेमत सुलतान सभागृह येथे करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॉ.महेबुब सय्यद व जिज्ञासा अ‍ॅकॅडमीचे प्रा. विठ्ठल बुलबुले, नगरसेवक फय्याज शेख उपस्थित होते.

यावेळी युनूस तांबटकर म्हणाले की, आज समाजामध्ये आरोग्याच्या समस्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे व ते फार महागही आहे अशावेळी युवा पिढी काजू,बदामपेक्षाही महाग गुटखा व माव्याचे सेवन करुन स्वत:चा व आपल्या कुटूंबियांचे जीवन उध्वस्त करत आहे. ही व्यसने मानवाला हळूहळू मरणाकडे घेऊन जाते, ज्याचे आम्हाला फार उशिरा ज्ञान होते व त्यावेळी आम्ही त्या व्यसनाने एवढे ग्रासलेलो असतो की ते व्यसन सोडल्यावर सुद्धा कॅन्सरसारख्या भयंकर आजारांना आम्हाला तोंड द्यावा लागतो.

वेळीच समाजाच्या प्रत्येक नागरिकांनी व्यसनमुक्तीवर शाळा-कॉलेज महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. संस्थांच्यावतीने अभिजित वाघ, अफजल सय्यद, डॉ. इमरान, शेख मुबीन, जावेद तांबोळी, शफाकत सय्यद, बाबुलाल खान, कॉ. महेबुब सय्यद, शेख शरफुद्दीन आदिंनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजूभाई शेख यांनी केले तर प्रास्तविक एजाज खान यांनी केले तर आभार आबीद दुलेखान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तारीक शेख, नादीर खान, आर्कि. फिरोज शेख, नईम सरदार, आदिल शेख, दत्ता वडवणीकर, शेख फिरोज चाँद, तनवीर चष्मावाला आदिंनी परिश्रम घेतले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: व्यसनाधीन होणे म्हणजे आत्महत्या करणेच Rating: 5 Reviewed By: DNA Live24