Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, २९ मार्च, २०१७

विकासकामांमुळेच भाजपच्या उमेदवारांचा विजय - पाचपुते

राळेगण ग्रामस्थांच्या वतीने कन्येचा भव्य सत्कार

जि. प. सदस्या सुनिता खेडकर व अशोक खेडकर यांचा सत्कार करताना माजी मंत्री बबनराव पाचपुते व इतर मान्यवर.

अहमदनगर । DNA Live24 - कर्जत तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून भाजपाने विकास कामांवर भर दिला आहे. तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी विकासाची गंगा कर्जतमध्ये आणली आहे. त्यांच्या कामामुळे अशोकराव यांच्या पत्नी सुनिता खेडकर यांना मतदारांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी केले. समोर बलाढ्य उमेदवार असतानाही केवळ कामाच्या जोरावर विजय संपादन केला, असे प्रतिपादन भाजप नेते तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले. 

नगर तालुक्यातील राळेगण ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुनिता खेडकर यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सत्कारमुर्ती नवनिवार्चित जि. प. सदस्या सुनिता अशोकराव खेडकर, कर्जतच्या सभापती पुष्पाताई युवराज शेळके, कर्जत पं. सं. सदस्या ज्योतीताई प्रकाश शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड होते.
यावेळी कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, कर्जत तालुकाध्यक्ष अशोकराव खेडकर, भाजपाच्या संघटक सुवर्णाताई पाचपुते, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, नगर तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगर शहर भाजपा उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकर, श्रीगोंद्याचे नगरसेवक सतीषराव मखरे, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गोरे, कर्जत मार्केट समितीचे संचालक संपतराव बावडकर, कोरेगाव सरपंच बापूसाहेब शेळके, मांदळीचे सरपंच धनेश गांगर्डे, सरपंच दादा दरेकर, राळेगणच्या सरपंच दिपाली भापकर, शरद कोतकर, पंकज मचे, अशोक वामन, वसंत आडोळे , माजी सैनिक किसनराव खराडे आदि उपस्थित होते.

प्रा. बेरड म्हणाले, भाजपाची सत्ता आल्यापासून विकासाचा वेग वाढला आहे. या विकासामुळेच कर्जतमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले आहे. विकास कामे सुरुच असून वेग वाढला असल्याचे बेरड म्हणाले. नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले, राळेगण ग्रामस्थांनी कन्येचा सत्कार केल्यामुळे भविष्यात काम करण्यास प्रेरणा मिळणार आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य व कर्जत तालुकाध्यक्ष अशोक खेडकर म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राळेगणमध्ये विकासकामे करण्याचा प्रयत्न करु. सत्कारामुळे नक्कीच काम करण्याची गती आणखी वाढणार आहे.

जि. प. सदस्य सुनिता खेडकर या सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, विजयी झालेल्या गटात पतीच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करणार आहेच पण माहेरासाठीसुध्दा काम करणार आहे. गावातील कोणतीही अडचण प्राधान्याने सोडविली जाईल. गावाने केलेल्या सत्कारामुळे मी भारावून गेले असून पुढील काळात कामासाठी नक्कीच उर्जा मिळेल, असेही त्या  म्हणाल्या. यावेळी सुवर्णाताई पाचपुते, बाळासाहेब महाडिक, सतीष मखरे, सुधीर भापकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष डावखऱे यांची भाषणे झाली. 

कार्यक्रमासाठी, नवनाथ भापकर, भरत हराळ, रवींद्र पिंपळे, सोपान भापकर, गोविंद भापकर, आदिनाथ खराडे, सचिन भापकर, अंकुशराव पिंपळे, नितीन पिंपळे, सोपान कुलांगे, संतोष हराळ, विजय डावखऱे, रघुनाथ दुरेकर, दत्तात्रय हराळ, धनाजी पवार, रावसाहेब पवार, हनुमंत कोतकर, सुयोग हराळ, सागर भापकर, संतोष हराळ, प्रशांत दुरेकर, संदिप खराडे यांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक सुभाष डावखरे यांनी केले. आभार विजय डावखरे यांनी मानले.  

भाजपचा विकासकामांवर भर -  यावेळी बबनराव पाचपुते म्हणाले, भाजपाने सर्वत्र विकास कामांवर भर दिला आहे. कर्जत तालुक्यातही भाजपाने विकासकामांच्या जोरावरच विजय मिळविला आहे. पुढील काळात निवडुन आलेल्या सदस्यांनी कामावर भर देणार आहेत. राळेगण ग्रामस्थांनी कन्येचा आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे काम करण्यासाठी सदस्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. जन्मभुमीसाठीही कामे करण्याचा प्रयत्न नवनिर्वाचित सदस्य करतील, असा विश्वास पाचपुते यांनी व्यक्त केला. 

Post Top Ad

Your Ad Spot

Pages