Header Ads

 • Breaking News

  घोडेगावात दहावीच्या परीक्षार्थींवर सीसीटीव्हीचा 'वॉच'

  घोडेगाव । DNA Live24 (दिलीप शिंदे) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाची परीक्षा ७ मार्चपासून सुरु होत आहेत. नेवासा तालुक्यातील घोडेगाव केंद्रावर यंदा एकूण ४०५ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. यंदा या केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात आल्यामुळे कॉपीबहाद्दरांवर चाप बसणार आहे.

  घोडेगाव केंद्र राजमार्गावर असल्याने येथे अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. या केंद्रामधे घोडेगाव, लोहोगाव, कांगोणी, शिंगवे तुकाई,  पांढरीपुल येथील परीक्षार्थी असणार आहेत. मागील दोन वर्षापासून येथे परीक्षा कालावधीत कॉपी बहाद्दर व कॉपी पुरवठा करणाऱ्या नागरिकांचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राचे व विद्यालयाचे नाव खराब होते, म्हणून श्री घोडेश्वरी विद्यालयाने जानेवारी महिन्यात ७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

  सीसीटीव्हीच्या वॉचमुळे कॉपी बाहेरुन पुरविणाऱ्या नागरिकांना आळा बसेल, असे विद्यालयाचे प्राचार्य बी. टी. चेमटे यांनी सांगितले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे एरवी शालेय परिसरात असणारा टारगटांचा त्रास व शालेय मालमत्तेचे होणारे नुकसान यालाही प्रतिबंध बसणार आहे. तेव्हा अशा प्रकारे त्रास देनाऱ्या नागरिकांनो सावधान, आपली छबी कॅमेऱ्यात आल्यास कारवाई अटळ आहे, असा असल्याचा इशाराही प्राचार्य चेमटे यांनी दिला आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad