Header Ads

 • Breaking News

  सावित्रीबाईंनी उंबरठा ओलांडून महिलांना दिशा दिली


  अहमदनगर । DNA Live24 - महिला चूल व मुल या दोन गोष्टींपुरतेच मर्यादित होत्या. उंबरठा ओलांडून सावित्रीबाईंनी महिलांना खर्‍या अर्थाने जगण्याची दिशा दिली. शिक्षणाची ज्योत घेवून त्यांनी क्रांती घडवली. आज महिला सर्व क्षेत्रात आपली गुणवत्ता सिध्द करत असून, याचे श्रेय सावित्रीबाई फुलेंना जाते,  अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी व्यक्त केली.

  चितळेरोड येथील आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालयात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रेश्मा आठरे, दिपक सुळ, प्रकाश भागानगरे, संजय झिंजे, सारंग पंधाडे, मारुती पवार, वैभव ढाकणे, रेखा जरे, भाऊसाहेब फुलसौंदर, अरविंद शिंदे, बजरंग भुतारे, गिरीश रासकर, अजय चितळे, अमित खामकर, फारुक रंगरेज आदि उपस्थित होते.

  यावेळी विधाते म्हणाले की, सनातनांचा विरोध व समाजाच्या रुढी, परंपरेला झुगारुन त्यांनी महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरण केले. विधवा व बालिकांना हक्क मिळवून दिला. समाजातील विषमता व निरक्षरता दूर करण्याचे काम त्यांनी केले. आज स्त्री चा सन्मान झाल्यास खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad