728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

जगण्याचा आनंद घेण्यासाठी कला आवश्यक - प्रदीप हलसगीकर


अहमदनगर । DNA Live24 - स्वतःचे वेगळे अस्तित्व व ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. त्यासाठी स्वतःचा छंद व आवडीचे ज्ञान घेतो. कलात्मक ज्ञानाची उंची प्राप्त करतो. व आपले जीवन समृद्ध करतो. कारण जगण्याचा खरा आनंद घेण्यासाठी कला आवश्यकच आहे आसे मत आकाशवाणी नगर केंद्राचे प्रदीप हलसगीकर यांनी व्यक्त केले. डॉ. भा. पा. हिवाळे संस्थेच्या अकॅडमी ऑफ फाईन अॅण्ड परफॉर्मिंग आर्ट्सचा १५ वा वर्धापन दिन कार्यक्रम माउली सभागृहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी डॉ. शरद कोलते, आयएमएसचे संचालक डॉ. एम. बी. मेहता, प्राचार्या डॉ. माधवी सराफ, समन्वयक डी. ए. कुलकर्णी, विक्रम बार्नबस उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भरतनाट्यम व कत्थकचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी हलसगीकर म्हणाले कि, नृत्य कला ही अत्यंत श्रेष्ठ कला असून शरीर व मनाचा उत्तम मेळ यातून साधला जातो. नृत्यकलेसाठी पाल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.

डॉ. शरद कोलते म्हणाले, अकॅडमीच्या प्रगतीसाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असून या संस्थेशी असलेले ऋणानुबंध कायम राहतील. नृत्य क्षेत्रासाठी संस्थेने नगरकरांना उत्तम व्यासपीठ दिले आता त्यात नविन प्रकल्प राबविण्याची गरज आहे. प्रास्ताविकात समन्वयक डी. ए. कुलकर्णी म्हणाले, डॉ. कोलते सरांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या अकॅडमीने सतत नवनवीन उपक्रम राबविले आहेत. आता भविष्यात नवे रूप व नव्या स्वरुपात अकॅडमीचे कार्य करण्याचा प्रयत्न असून सर्वांचे मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे.

अहवाल वाचन प्राचार्या डॉ. माधवी सराफ रावळ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात बालगंधर्वांच्या प्रसिद्ध नांदी ‘नमन नटवरा’ ने झाली. शिक्षिका कल्याणी सवडकर यांनी ‘ताल’ शास्त्रीय कथ्थक नृत्यशैली सादर केली. ऋतुरंग या नृत्य प्रस्तुतीमध्ये भरतनाट्यमच्या विध्यार्थीनिनी सहा ऋतूंच्या विविध छटा दर्शविणारे नृत्य सादर केले. माधवी रावळ दिग्दर्शित या ऋतुरंगास साथसंगत मकरंद खरवंडीकर, यांनी दिली. उत्तरार्धात बाल विध्यार्थीनिंनी विठ्ठल भक्तीत रंगलेले वारकरी सादर केले.

सर्वात शेवटी तराना व आईना या नाविन्यपूर्ण प्रकारातून बाल ते प्रौढ अवस्थेपर्यंत ‘स्त्री व आरसा’ नाते कलात्मकरीत्या सादर केले गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली बोपर्डीकर, अाश्लेषा पोतदार, अश्विनी भोरे, शिवानी फुलसौंदरने केले तर आभार कल्याणी सवडकर यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, विध्यार्थी, नृत्यप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: जगण्याचा आनंद घेण्यासाठी कला आवश्यक - प्रदीप हलसगीकर Rating: 5 Reviewed By: DNA Live24