728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नगरमध्ये दक्षिणायन चित्रपट महोत्सव

अहमदनगर । DNA Live24 - न्यू आर्टस्, कॉमर्स अंड सायन्स कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभाग व न्यू आर्टस डीसीएस फिल्म सोसायटीच्या वतीने दक्षिणायन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आजपासून (११ मार्च) नगरमध्ये सुरू होत आहे. न्यू आर्टस कॉलेजातील राजर्षी शाहू महाराज थिएटरमध्ये हा महोत्सव भरणार आहे.

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, लेखक कलबुर्गी यांसारख्या विचारवंतांच्या हत्येनंतर पद्मश्री गणेश देवी यांनी काही साहित्यिक, कलावंत आणि विचारवंत सोबत घेऊन दक्षिणेकडे चला, या अर्थाने दक्षिणायन ही चळवळ सुरु केली. या दक्षिणायन चळवळीचे विस्तारित स्वरूपातील आकलन तरुणांना होण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. यापूर्वी नाशिकमध्येही असा फेस्टिवल भरवण्यात आलेला आहे. ख्यातनाम दिग्दर्शक अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी निवडलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन या महोत्सवात केले जाईल.

या महोत्सवात प्रत्येक शनिवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत सिनेमांचे प्रदर्शन केले जाईल. ११ मार्चला दुपारी ३ वाजता 'इनव्हिक्टस' या चित्रपटापासून या महोत्सवाला सुरुवात होत आहे. दर शनिवारी विविध देशातील ९ चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. न्यू आर्टस कॉलेजातील राजर्षी शाहू महाराज थिएटरमध्ये हा महोत्सव भरत आहे. महोत्सवात सर्वांना प्रवेश खुला आहे, असे डीसीएस फिल्म क्लबच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या महोत्सवाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे -
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नगरमध्ये दक्षिणायन चित्रपट महोत्सव Rating: 5 Reviewed By: DNA Live24