मुंबई l DNA Live24 - संरक्षणमंत्री मनोहर
पर्रीकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांची
केंद्र सरकारमधील जागा रिकामी झाली आहे. त्यांच्या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या
मुख्यमंत्री पदासाठी संभाजी पाटील निलंगेकर व चंद्रकांत दादा पाटील यांच्या चुरस
निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात जोरदार घोडदौड केली. नगरपालिका,
जिल्हा परिषद, पंचायत समितीसह महानगरपालिकांमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.
फडणवीस यांच्या झंजावती दौर्यांमुळे भाजपला हे यश मिळाले. त्यामुळे
मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्व विचार करत
आहे.
मध्यंतरी झालेल्या मराठा
क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थोडी
नाराजी आहे. त्यामुळे राज्याला मराठा समाजातील नेतृत्व देण्याचा विचार होत आहे.
त्यानुसार लातूरचे बडे प्रस्थ संभाजी पाटील निलंगेकर व सार्वजनिक बांधकाम मंत्री
चंद्रकांत दादा पाटील या दोघांची नावे मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहेत. त्यामुळे
राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण याविषयी उत्सुकता लागली आहे.
------------------------
ताज्या बातम्या-
मुख्यमंत्री बदलावर संघ नेत्यांची प्रतिक्रिया
------------------------
ताज्या बातम्या-
मुख्यमंत्री बदलावर संघ नेत्यांची प्रतिक्रिया