Header Ads

 • Breaking News

  झेडपीच्या नवीन अध्यक्षासाठी २१ मार्चला निवडणूक

  अहमदनगर l DNA  Live24- जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता लागली असून, नवीन अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी येत्या २१ मार्चला निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेमध्ये जिल्हा परिषदेचे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जातील. जुन्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांची मुदत २१ मार्चलाच संपत असल्याने त्याआधी नवीन निवडी होणे आवश्यक आहे.


  जिल्ह्यात काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी होण्याचे जवळपास फिक्स आहे. काँग्रेसच्या जागा जास्त असल्याने अध्यक्षपदावर काँग्रेसने दावा ठोकला आहे. तर राष्ट्रवादीने उपाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी ना. राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांचे नाव आघाडीवर असून, थोरात गटाकडून अनुराधा नागवडे यांचे नाव चर्चेत आहे.


  तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्याकडून प्रताप ढाकणे यांच्या पत्नीचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान अकोल्यातून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी संधी देण्याची मागणी होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी २१ मार्चला जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभा होणार आहे. त्यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यात येतील. दोन्ही पदासाठी एक - एक अर्ज आल्यास बिनविरोध निवड होईल. मात्र त्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास निवडणूक होणार आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad