728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नेवासा नगरपंचायत : अंतिम मतदार यादी आज होणार प्रसिद्ध

नेवासा । DNA Live24 - नेवासा नगर पंचायतीसाठी प्रारूप याद्या दुरुस्तीनंतर व हरकती नंतर २० तारखेस अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आज २३ तारखेस मातदारांच्या हातात अंतिम मतदार यादी पडणार असून उमेदवारांची प्रतीक्षा संपणार आहे.

नेवासा नगर पंचायतीची पहिलीच निवडणूक ग्रामपंचायत बरखास्ती नंतर अनेक राजकीय व न्यायालयीन कुरघोड्यामुळे वर्षभर लांबली. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ दिसून आला. अंतिम मतदार यादी दि.२० मार्च रोजी प्रसिद्ध होणे गरजेचे होते. ही मतदार यादी तब्बल तीन दिवस उशिराने प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची प्रचंड घालमेल होत होती. मुंबईमध्ये याद्या दुरुस्त होणारी हि पहिलीच नगर पंचायत असेल. त्यात नियुक्त झालेले मुख्याधिकारी मतदार याद्याच्या गोंधळने रजेवर गेल्याने प्रभारी मुख्याधिकारी म्हणून अविनाश गंगोडे हे काम पाहत आहेत.

निवडणूक मतदार याद्या कार्यक्रमानुसार शहरात एकूण १३ हजार ९९६ मतदार आहेत.

प्रभागनिहाय अंतिम मतदार पुढील प्रमाणे-प्रभाग क्रमांक - एकमध्ये ८५४,
प्रभाग दोन मध्ये ८८५,
प्रभाग तीन मध्ये-११८६,
प्रभाग ४ मध्ये-८१८,
प्रभाग पाच मध्ये -४३६ ,
प्रभाग सहा मध्ये ९३२,
प्रभाग सात मध्ये ७००,
प्रभाग आठ मध्ये ६७५,
प्रभाग नऊ मध्ये २५०,
प्रभाग दहा मध्ये ९०१,
प्रभाग अकरा मध्ये १००२,
प्रभाग  बारा मध्ये ११९०,
प्रभाग तेरा मध्ये ७४४,
प्रभाग चौदा मध्ये १०१२,
प्रभाग पंधरा मध्ये ५९७,
प्रभाग सोळा मध्ये ११३०
प्रभाग सतरा ६८४ मतदारांचा  समावेश आहे. 
बहिष्काराची होती नेवासेकरांची तयारी - मतदार यादी आज प्रसिद्ध झाली नसती तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी नेवासेकरांनी केली होती. यासाठी सर्व पक्षीय उमेदवारांनी बुधवारी दुपारी पासून सह्यांची मोहीम सुरू केली होती.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नेवासा नगरपंचायत : अंतिम मतदार यादी आज होणार प्रसिद्ध Rating: 5 Reviewed By: DNA Live24