Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

रविवार, १२ मार्च, २०१७

माजी सैनिकांचे समाजसेवेचे व्रत प्रेरणादायी - गोरक्ष काळे


अहमदनगर । DNA Live24 - सामाजिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनला जेऊर येथील माजी सैनिक पोपटराव काळे यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत देण्यात आली. माजी सैनिकांनी पेन्शनच्या काही रक्कम जमा करुन फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य चालू केले आहे. त्यांच्या या कार्याला हातभार लावण्यासाठी गोरक्ष काळे व संतोष काळे यांनी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांच्याकडे 5 हजार 555 रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.

यावेळी सचिव जगन्नाथ जावळे, निवृत्ती भाबड, भाऊसाहेब कर्पे, दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर, माजी पोलिस अधिकारी यादव आव्हाड, रघुनाथ औटी, रामराव दहिफळे, भाऊसाहेब पालवे, बळवंत पालवे, भाऊसाहेब मोटे, बलभीम मोढवे, अशोक जावळे, अजय डोळसे आदि उपस्थित होते. सीमेवर देशरक्षणाचे कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झाल्यानंतर माजी सैनिकांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. त्यांच्या सामाजिक कार्यास हातभार लावणे कर्तव्य असल्याची भावना गोरक्ष काळे यांनी व्यक्त केली. फाऊंडेशनच्या वतीने वृक्षरोपण, माजी सैनिकांसाठी आरोग्य तपासणी, नेत्रदान, स्त्री जन्माचे स्वागत, जलसंधारण जनजागृती आदि विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहे, असे शिवाजी पालवे यांनी सांगितले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages