Header Ads

 • Breaking News

  शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा- क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा उद्या मोर्चा


  नेवासा । DNA Live24 - शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली नेवासा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

  कर्जाच्या ओझ्याखाली दबून राज्यभरात शेतकरी आत्महत्या करत आहेत. वर्षानुवर्षे आलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडले. शेतीत पीकच नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. नुकतेच उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना सत्तेवर आल्यास कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याची मागणी उद्याच्या मोर्चात करण्यात येणार आहे.

  तालुक्यातील सर्व शेतकरी तसेच कार्यकर्त्यांना आपापला सात-बारा घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण शांत राहणार असे वाटत असताना गडाखांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरु असल्याने गडाखांच्या आंदोलनाला महत्व प्राप्त झाले आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad