728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेशचा माजी मंत्री अटकेत

लखनऊ l DNA Live24 - समाजवादी पार्टीचे सर्वेसवा मुलायम सिंग यांचे निकटवर्तीय आणि अखिलेश यादव मंत्रीमंडळातील सदस्य गायत्री प्रजापती यांना पोलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केली. फरार असणाऱ्या प्रजापतीला लखनऊमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.

बलात्काराचा आरोप असलेले गायत्री प्रजापती यांना बुधवारी लखनऊमध्ये अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी सामूहिक बलात्कारप्रकरणातील त्यांच्या तीन साथीदारांना अटक केली होती. यापूर्वी आणखी दोघांना नोएडा आणि जेवारमधून ताब्यात घेण्यात आले होते.

गायत्री प्रजापती आणि त्यांच्या सहा साथीदारांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या सर्वांनी पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. सर्वोच्च न्यायालयाने १७ फेब्रुवारीला प्रजापती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, अखिलेश यादव यांनी काही महिन्यांपूर्वीच गायत्री प्रजापती यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. पण परत त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेशचा माजी मंत्री अटकेत Rating: 5 Reviewed By: DNA Live24