Header Ads

 • Breaking News

  नेवाशाच्या नागरी सुविधांसाठी १ कोटी ४५ लक्ष निधी - आमदार मुरकुटे

  नेवासे । DNA Live24 - नेवासे नगर पंचायतीला पायाभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत नगर विकास विभागाकडून १ कोटी २५ लक्ष रुपये तर नगर पंचायत हद्दीतील रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाकडुन सर्वसाधारण रस्ता अनुदान योजनेतुन २० लक्ष रुपये मंजूर करुन आणला असल्याची माहिती भाजपचे नेवासे तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली आहे.

  नेवासा हे तालुक्याचे ठिकाण असूनही या शहरातील रस्ते व पायाभूत सुविधा दुर्लक्षित ठेवल्याने शहराचा विकास खुंटला होता. आता या शहराचा विकास करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरासाठी मोठा निधी आणला आहे. या निधीतून रस्ते भुमीगत गटारी, सार्वजनिक शौचालये, सर्व धर्मियांच्या प्रार्थना स्थळांच्या विकासाबरोबर स्मशानभूमींची कामे केली जाणार आहेत. तसेच तीर्थक्षेत्र विकास कामांना गती देऊन त्यासाठी वाढीव निधी आणला आहे, असेही मुरकुटे म्हणाले.

  नगर पंचायत स्थापन करून पंचायतीस विविध विकास कामांसाठी ६ .५ कोटी(साडे सहा कोटी) रुपयांचा निधी आणला आहे, हा निधी व नुकताच मंजुर झालेला १ कोटी ४५ लक्ष निधीतून होणाऱ्या कामांमुळे शहराचा चेहरा बदलेल, असा विश्वास मुरकुटे यांनी व्यक्त केला आहे. या निधीचा व्यावसायिकांसह नागरिकांना फायदा होईल. व्यापारी पेठेसह शहरातील रस्ते विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले.

  विकासाला गती मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास मंत्री रणजित पाटील व पालकमंत्री राम शिंदे यांच्या सहकार्याने नेवासा नगर पंचायतीस मोठा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नेवासे शहर विकासाला गती मिळेल. - आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप

  Post Top Ad

  Post Bottom Ad