Header Ads

 • Breaking News

  हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठाणतर्फे नगर कॉलेजजवळ पाणपोई

  अहमदनगर । DNA Live24 - उन्हाची तीव्रता वाढत असताना पदचारींना शुध्द पिण्याची पाण्याची व्यवस्था होण्यासाठी हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने नगर-पुणे महामार्गावरील अहमदनगर महाविद्यालया जवळ पाणपोई सुरु करण्यात आली. पाणपोईचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते झाले.

  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, उबेद शेख, साहेबान जहागीरदार, लालू सेठ, संकेत गुरव, जावेद शेख, मतीन खान, डॉ. रिजवान शेख, आतिश कटारीया, एजाज सय्यद, अरशान शेख, जुनेद शेख, फैजल गुलशन, असद इराणी, शाहिद शेख, गुलाम शेख, अब्बा नगरवाला आदि उपस्थित होते.

  प्रा.विधाते म्हणाले की, पाणी पाजणे हे मोठे पुण्याचे काम आहे. रखरखत्या उन्हात पदचारी पिण्याच्या पाण्याचा शोध घेताना दिसत आहे. सर्वसामान्यांना पैसे देऊन पिण्यास बंद बाटलीचे पाणी घेणे परवडणारे नसून, सर्वांसाठी शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात आल्याबद्दल त्यांनी प्रतिष्ठाणचे कौतुक केले. सुरु करण्यात आलेल्या या पाणपोईच्या माध्यमातून वाटसरुंना दररोज जारचे शुध्द पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad