Header Ads

 • Breaking News

  आमदार मुरकुटेंवरील हल्ल्याची सीआयडी चौकशी व्हावी; नेवाशात उपोषण

  नेवासा । DNA Live24 - भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर घोडेगांव येथे झालेल्या हल्ल्याची सीआयडी चौकशी करावी, या मागणीसाठी  नेवासा तहसिल कार्यालयावर दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघाचे तालुकाध्यक्ष नितीन मिरपगार यांच्या नेत्तृत्वाखाली आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

  हल्ल्याचा बताव करणाऱ्या मुख्य सुञधाराचा शोध घेवून विनाकारण हल्ल्यात गोवलेल्या संतोष भिंगारदिवे व त्याच्या साथिदारांवर लावण्यात आलेले भारतीय दंड विधान कलम ३०७ सह सर्व गुन्हे मागे घेवून  विनाशर्त सुटका करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

  भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर कथित हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेण्यात यावा. विनाकारण हल्ल्याचा बताव रचण्यात आला. संतोष भिंगारदिवे व त्याच्या साथीदारावर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून, ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाव्यापी आंदोलन सुरु करण्यात येईल असा इशारा नितिन मिरपगार यांनी दिला आहे.

  अन्यथा आंदोलनामुळे होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी आ.मुरकुटे व शासनावर राहिल, असेही मिरपगार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या उपोषणात राहूल सुर्यवंशी, जाकिर शेख, भाऊसाहेब वाघ, मुन्ना चक्रणाायण, सचिन बनसोडे, सचिन वडागळे, संदिप कुसळकर यांच्यासह घोडेगाव परिसरातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

  Post Top Ad

  Post Bottom Ad