Header Ads

 • Breaking News

  'जरा याद करो कुर्बानी' अभियानास पाठबळ द्या : तहसिलदार सुशिल बेल्हेकर


  जामखेड (प्रतिनिधी ) l DNA Live24 - देशाच्या संरक्षणासाठी आपला पोटचा गोळा व कुंकू देणारी कुंटूबे हीच देशाची खरी संपत्ती असून, या संपत्तीला जपण्यासाठी सामाजिक क्षेञातील संस्थांनी हाती घेतलेले "जरा याद करो कुर्बानी" या राज्यव्यापी अभियानास समाजाने पाठबळ द्यावे असे आवाहन जामखेडचे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले.

  जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज 8 मार्च रोजी कस्तुररत्न फाऊंडेशन पुणे, प्रयोगवन परिवार जामखेड, अजित फाउंडेशन बार्शी या सामाजिक संस्थांच्या संयुक्त पुढाकारातुन देशासाठी लढता लढता शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जामखेड येथील तहसिल कार्यालयात "जरा याद करो कुर्बानी" या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ शहीद जवान नितीन जगताप यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत, किराणा, कपडे देऊन  करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

  यावेळी नायब तहसीलदार शिल्पा पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप वाघमारे, विश्वदर्शन न्यूजचे संपादक गुलाब जांभळे, जामखेड पञकार संघाचे अध्यक्ष लियाकत शेख ,मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष मिठुलाल नवलाखा, अजित फाऊंडेशनच्या सचिव विनया जाधव, शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग भोसले, अजित फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर, प्रयोगवनचे अध्यक्ष सत्तार शेख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

  तहसिलदार सुशिल बेल्हेकर म्हणाले कि, कस्तुररत्न फाऊंडेशन, प्रयोगवन परिवार व अजित फाऊंडेशन या संस्थांनी देशासाठी लढता लढता शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू केलेले अभियान तरूणांसाठी व समाजासाठी दिशादर्शक आहे.

  पोलीस निरीक्षक दिपक वाघमारे म्हणाले कि,शहिद जवानांच्या बलिदानाचे समाजाने सतत सजग राहुन जाण ठेवणे आवश्यक असुन शहीद कुटूंबाचा आधारवड ठरण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
  नायब तहसीलदार शिल्पा पाटील म्हणाल्या कि, जागतिक महिलादिनी सामाजिक संस्थांनी घेतलेल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातुन शहिद कुटूंबाला दिलेली आर्थिक मदत खर्या अर्थाने  विरपत्नीचा सन्मान व त्यागाचा सन्मान करणारी आहे.

  यावेळी शहिद जवान नितिन जगताप यांच्या पत्नी रोहीणी जगताप यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी जगताप कुटूंबाला 11 हजार रूपयांचा धनादेश,दोन महिन्यांचा किराणा,वीरपत्नीस साडी,मुलांना कपडे अशी मदत सुपुर्द करण्यात आली.

  अजित फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांनी शहिद जवानांच्या कुटूंबाला मदत करण्यासाठी सुरू केलेल्या जरा याद करो कुर्बानी या राज्यव्यापी अभियान सुरू करण्यामागची भूमिका सविस्तर मांडली.
  यावेळी शिवाजी इकडे, संजय वारभोग, ओंकार दळवी, यासीन शेख, नंदुसिंग परदेशी, हनुमंत काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रयोगवनचे अध्यक्ष सत्तार शेख, सुञसंचालन लियाकत शेख, आभार अजित फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांनी मानले.

  महिला कामगारांचा सन्मान - जामखेड नगरपरिषदेतील स्वच्छता विभागातील सफाई कामगार जनाबाई घायतडक, सुनिता घायतडक,पद्माबाई जाधव,अनिता डाडर, आशाबाई सदाफुले,विद्या गायकवाड या महिला कामगारांचाही यावेळी कस्तुररत्न फाऊंडेशन, प्रयोगवन परिवार,अजित फाउंडेशन यांच्यावतीने सन्मानित करण्यात आले
  तहसीलचे महिला कर्मचारीही सन्मानित - जरा याद करो कुर्बानी या राज्यव्यापी अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात महिला दिना निमित्ताने जामखेडच्या नायब तहसिलदार शिल्पा पाटील यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी मंदा गर्जे, ज्योती दांगट, आरती कुसकर,यांचाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसास मदत - यावेळी झालेल्या कार्यक्रमात महसुल प्रशासनाच्या वतीने पिंपरखेड  येथीलआत्महत्याग्रस्त शेतकरी कैलास कदम यांच्या वारस वैशाली कदम यांना यावेळी एक लाख रूपयाची मदतीचा धनादेश देण्यात आला.

  Post Top Ad

  Post Bottom Ad