728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

मुलींना उच्चशिक्षित केल्यास समाजात परिवर्तन - बाबाजी गोडसे

अहमदनगर । DNA Live24 - मुलींना उच्चशिक्षित केल्यास समाजात परिवर्तन घडेल. मुली व मुलांमध्ये भेद न मानता, महिलांना प्रतिष्ठेची वागणूक देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुक प्रक्रियेत युवकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे मत नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांनी व्यक्त केले. मनुष्यबळ विकास केंद्र (कासा) व जय युवा अ‍ॅकेडमीच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी आयोजित एक दिवसीय पडोस युवा सांसद कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी अ‍ॅड. महेश शिंदे, कासाचे प्रकल्प अधिकारी सुनिल गायकवाड, पोपट बनकर, अ‍ॅड. भानुदास होले, योगिता देवळालीकर, प्रा. रमेश वाघमारे, धीरज ससाणे, भीमराव उल्हारे, नाना डोंगरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षसंवर्धनाचा संदेश देवून, औषधी वनस्पतीस पाणी अर्पणाने करण्यात आली. अ‍ॅड. महेश शिंदे यांनी मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हा संदेश देवून, महिलांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षण देवून सक्षम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

सुनिल गायकवाड यांनी गाव रोगमुक्त होण्यासाठी ग्रामस्वच्छता अभियानाची आवश्यकता विशद केली. तसेच आदर्श गाव संकल्पनेसाठी स्वत:पासून सुरुवात करण्याचे युवकांना त्यांनी आवाहन केले. प्रा.रमेश वाघमारे यांनी गाव पातळीवर युवा मंडळ उभारुन शासनाच्या योजना गावात प्रभावीपणे राबविण्याचा सल्ला दिला. युवकांनी गावात काम करताना डोके शांत ठेवून, गोड बोलून व पायातील गतीद्वारे विकास घडवण्याचे मार्गदर्शन केले. योगिता देवळालीकर यांनी व्यक्तीमत्व विकासावर युवकांना मार्गदर्शन केले.

रसिक रंजन कला अविष्कार ग्रुपचे धीरज ससाणे यांनी युवा जागृतीवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यशाळेचे सुत्रसंचलन सुनिल गायकवाड यांनी केले. आभार कांतीलाल पाटोळे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी नेहरु युवा केंद्राचे रमेश गाडगे, तालुका समन्वयक सोमनाथ भस्मे, मनिषा खरात, ज्योती करंजे, अक्षय चौधरी, गणेश पटेकर, कासा संस्थेचे अक्षय मगर, सलिम सय्यद, श्रध्दा उल्हारे, चैतन्य ल्हारे, प्रतिभा डोंगरे, संतोष कांडेकर आदिंनी परिश्रम घेतले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: मुलींना उच्चशिक्षित केल्यास समाजात परिवर्तन - बाबाजी गोडसे Rating: 5 Reviewed By: DNA Live24