728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

Jio प्राईम मेंबरशीपसाठी रजिस्ट्रेशन सुरु !

मुंबई l DNA Live24-
1 मार्चपासून जिओ प्राईम मेंबरशिपचं रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे. जिओ यूझर्स 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत MyJio अॅप किंवा jio.com वर जाऊन 99 रुपय भरुन जिओ प्राईम मेंबर बनू शकतात. 99 रुपयांच्या या मेंबरशिपची मुदत एक वर्षासाठी असेल. म्हणजेच 1 एप्रिलपर्यंत तुम्ही जिओ प्राईम मेंबर असाल.

याच लोकांना जिओ प्राईम मेंबरशीप
जिओचं सिम वापरणाऱ्या आतापर्यंतच्या 10 कोटी ग्राहकांना, तसेच 31 मार्चपर्यंत जिओ सिमशी जोडले जाणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. 1 मार्च 2017 पासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 1 मार्च ते 31 मार्च 2017 दरम्यान तुम्ही रजिस्ट्रेशन करावं लागेल. जिओ प्राईम मेंबर बनण्यासाठी यूझर्सना 99 रुपये मोजावे लागतील.
------------------------------------------------------------------------------------------------------

या व्हिडीओमध्ये पहा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया--------------------------------------------------------------------------------------------------------------
अशी असेल किंमत 
1 मार्च ते 31 मार्च 2017 दरम्यान 99 रुपये देऊन जिओ यूझर्स प्राई मेंबर बनू शकतील आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला 303 रुपये देऊन हॅप्पी न्यू ईयर स्कीममधील सेवांचा पुढल्या 12 महिन्यांपर्यंत म्हणजेच 1 एप्रिल 2018 पर्यंत लाभ घेता येणार आहे. याचसोबत, देशांतर्गत नेटवर्कवर व्हॉईस कॉल पूर्णपणे मोफत असतील. रोमिंग चार्जेसही लागू होणार नाहीत आणि कोणतेही छुपे चार्जेसही आकारले जाणार नाहीत.

असा होणार ग्राहकांचा फायदा
जिओ प्राईम मेंबरशिप घेतल्यानंतर ग्राहकांना जिओची सध्या सुरु असलेली हॅप्पी न्यू ईयर योजनेचा पुढील 12 महिने मोफत लाभ घेता येणार आहे. याशिवाय, कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगिल्यानुसार, जिओ प्राईम मेंबरसाठी अन्य आकर्षक प्लॅनच्या घोषणाही केल्या जाणार आहेत. जिओच्या प्राईम यूझर्सचा जिओ मीडिया, जिओ टीव्ही, जिओ सिनेमाचं फ्री अॅक्सेस मिळणार आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: Jio प्राईम मेंबरशीपसाठी रजिस्ट्रेशन सुरु ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24