Header Ads

 • Breaking News

  मुंबईतील गांजातस्कर नगरमध्ये गजाआड

  अहमदनगर । DNA Live24 - नगरमधून मुंबईला गांजा घेऊन जाणाऱ्या एका तस्कराला कोतवाली पोलिसांनी नेप्ती नाका परिसरात पकडले. सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई केली. सुनिल शिवराम खडसे (५८, रा. मालाड, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. 

  नेप्ती नाक्याजवळ गांजा घेऊन एक जण येणार असल्याची माहिती पोलिसांनी गोपनीय सू़त्रांकडून मिळाली होती. पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी ही माहिती कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सुनिल वसावे, आदींच्या पथकाने नेप्ती चौकामध्ये सापळा लावला.

  रात्री साडेआठच्या सुमारास एक संशयित तेथून जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यामध्ये त्याच्याकडे ५ किलो गांजा सापडला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात त्याच्यािविरुद्ध अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  शनिवारी दुपारी खडसे याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने गांजा कोठून आणला, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी करायची आहे. त्यामुळे त्याला पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने ती मान्य करीत त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.

  Post Top Ad

  Post Bottom Ad