Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

सोमवार, १३ मार्च, २०१७

नगर भाजपमध्ये मोठ्या संख्येने युवकांचा प्रवेश


अहमदनगर । DNA Live24 - युवकांच्या जीवनात वेगवेगळी वळण येत असतात. या वळणावर युवकांनी भाजपच्या सक्षम नेतृत्वाबरोबर जाण्याच्या निर्णयाने युवकांचे विकासात्मक वाटचालीकडे पाऊल पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ, सबका विकास' ही घोषणा सत्यात उतरवित आहे. याची परिचिती भाजपाला उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये मिळालेल्या अभूतपुर्व विजयाने आली आहे. दुष्टकृत्याची होळी करुन, युवकांनी भाजपच्या विचारातून समाजाला सक्षम, सदृढ व प्रगतशील करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते राहुल वैद्य व वैभव गुगळे यांच्यासह मोठ्या संख्येने युवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांच्या स्वागत कार्यक्रमात खासदार गांधी बोलत होते. यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी, किशोर बोरा, श्रीकांत साठे, नितीन शेलार, चेतन जग्गी, धनंजय जामगावकर, बंटी ढापसे, कैलास गर्जे, महेश सब्बन, साहेबराव काते आदिंसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गांधी म्हणाले की, प्रत्येक पक्षाची वेग-वेगळी विचारधारा आहे. भाजप राष्ट्रभक्तीने प्रेरित होवून कार्य करत असून, युवकांना या पक्षाचे अधिक आकर्षण वाटत आहे. शहराच्या विविध भागातून आलेल्या युवकांच्या प्रवेशाने पक्षाचे कार्य अजून प्रभावी होणार असल्याची आशा व्यक्त करुन, सर्व सामान्यांसाठी असलेल्या शासनाच्या योजना घराघरात पोहचविण्यासाठी युवकांना पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

राहुल वैद्य यांनी युवकांचे संघटनात्मक कार्य भाजपच्या विचारधारेशी जुळते असून, भाजपच्या पक्ष प्रवेशाने अधिक प्रभावी सामाजिक कार्य उभे करता येणार असल्याची आशा व्यक्त केली. सुवेंद्र गांधी यांनी युवकांचा रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून भाजप सरकार युवकांना पायावर उभे करण्याचे काम करत असल्याचे सांगून, भाजपच्या कार्यकर्त्यांना अडीअडचण आल्यास पक्षाचे नेते त्यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचा विश्‍वास दिला.

यावेळी सफल जैन, मोहित गुंदेचा, शुभम गुगळे, महेश येणारे, अंकुश भापकर, चेतन ढगे, कुणाल जैन, आकाश शिंदे, सुजय मोहिते, रुशाल साळवे, किरण चव्हाण, कुणाल भांडोत, राहुल कटारिया, सोनू गायकवाड, आकाश शिंदे, साहिल बाफना, निरज व्यास, केतन गुगळे, लोकेश गांधी, दर्शन धोका, शुभम पाटोळे, संदेश पानसरे, अथर्व कुलकर्णी, यश मुथा, वैभव आंबेकर, दिपक मंडलिक, प्रथमेश शिंदे आदिंसह मोठ्या संख्येने युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages