728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

चांद्यात तुकाराम बीजेनिमित्त ध्यान शिबिर

चांदा । DNA Live24 - नेवासा तालुक्यातील चांदा येथील श्री दत्त साधकाश्रमात तुकाराम बीजेनिमित्त अखंड नाम चिंतन सप्ताह (ध्यान शिबीर)चे आयोजन करण्यात आले आहे. येथील गुरुवर्य रोहिदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

ध्यान शिबिराचे यंदा ३६ वे वर्ष आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने राज्यासह देशभरातील भाविक यामध्ये सहभागी होत असतात. सप्ताहाची सुरुवात ८ मार्च रोजी होईल. सप्ताहानिमित्त हभप बाबुराव महाराज सोनावणे, दीनानाथ महाराज पाठक, जगदीश महाराज खरात, हिम्मत महाराज माळी, पेहेरे महाराज, अंबादास महाराज दहिवाळ यांची कीर्तने होणार आहेत. मंगळवारी १४ मार्चला सकाळी ९ ते ११ यावेळेत गुरुवर्य रोहिदासजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल.

सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ आरती, ७ ते ८ ध्यानपर प्रवचन, ८ ते ११ ध्यान, दुपारी ३ ते ५ दरम्यान देविदास महाराज आडभाई यांचे तुकाराम महाराज चरित्रावर प्रवचन, ७ ते ८ हरिपाठ तर रात्री ९ ते ११ दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सप्ताहात भाविकांतर्फे सकाळी व सायंकाळी अन्नदान करण्यात येते.

श्री दत्त साधकाश्रमात वर्षभर विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येतात. तुकाराम बीज सोहळ्यासाठी दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये चांदा गावासह आसपासच्या गावातील भाविकही श्रद्धेने सहभागी होतात. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी चांदा व परिसरातील तरुण मंडळांचे मोठे सहकार्य असते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: चांद्यात तुकाराम बीजेनिमित्त ध्यान शिबिर Rating: 5 Reviewed By: DNA Live24