Header Ads

 • Breaking News

  प्रविण रसाळ, जितू गंभीर, ईश्वर ब्राम्हणेच्या टोळ्यांविरुद्ध 'मोक्का' ?

  अहमदनगर । DNA Live24 - पारनेर तालुक्यातील कुख्यात वाळूतस्कर व गुंड प्रविण आनंदा रसाळ, बनावट दारुनिर्मिती करणारा जगजीतसिंग गंभीर व वाडेगव्हाण गोळीबार प्रकरणातील आरोपी ईश्वर ब्राम्हणे, अशा तीन टोळ्यांविरुद्ध मोकाचे (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव शनिवारी दुपारी पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्याकडे सादर करण्यात आले.

  नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन टोळ्यांविरुद्ध मोक्काचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर ते नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर केले जाणार आहेत. निघोजचे माजी उपसरपंच संदीप वराळ यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या प्रविण आनंदा रसाळ याच्या टोळीविरुद्ध यापूर्वीही मोकाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. मात्र, त्यामध्ये त्रुटी निघाल्याने तो मंजूर झाला नाही. 

  नगर जिल्ह्यात आतापर्यंत तेराहून अधिक जणांच्या मृत्युकांडाला जबाबदार असलेले बनावट दारुनिर्मिती रॅकेटमधील आरोपी जितू गंभीर, जाकीर शेख व इतरांविरुद्ध आता मोकाचा प्रस्ताव तयार केला आहे. या टोळीचे कनेक्शन राज्यभर असल्याचे समोर आले आहे. याशिवाय वाडेगव्हाण गेल्या दीड महिन्यापूर्वी झालेल्या टोळीयुद्धातील आरोपींवरही मोकाचा प्रस्ताव तयार केला आहे. वाडेगव्हाण शिवारात दोन टोळ्यांमध्ये भीषण गँगवॉर झाले होते. सुपा व रांजणगाव एमआयडीसीवर वर्चस्व मिळवण्याच्या वादातून हे गँगवॉर भडकले होते.

  Post Top Ad

  Post Bottom Ad