Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

सोमवार, १३ मार्च, २०१७

मुस्लिमांना आरक्षण हा संवैधानिक अधिकार - प्रा. जावेद पाशा

अहमदनगर । DNA Live24 - सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय मुस्लिमांना आरक्षण हे सैवंधानिकच आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि बिहार भारतातील राज्ये आहेत. त्यांनी संविधानाला अधिन राहुनच मुस्लिमांना आरक्षण दिले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारालाही मुस्लिमांना आरक्षण द्यावेच लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्रीयन मुस्लिम अधिकार आरक्षण आंदोलनाचे राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. जावेद पाशा कुरेशी यांनी केले.

रहेमत सुलतान सभागृहात आयोजित मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात समाजात प्रबोधन व सैवंधानिक कायदेशीर मार्गदर्शन प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमंत्रक युनुस तांबटकर तर प्रा. महेबुब सय्यद, सय्यद वहाब, आर्किटेक्ट अजिम शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण (मॉ.आंदोलन) हे महाराष्ट्रातील शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या मुस्लिमांचे सैवंधानिक पद्धतीने चालविले जाणारे लोकशाहीवादी जनआंदोलन आहे, असे ते म्हणाले.

शिक्षणाचा अभाव व गरीबी ही या महाराष्ट्रातील गरीब मुसलमानांची प्रमुख ओळख आहे. आर्थिक दरिद्रता, सोयींचा अभाव व सामाजिक मागासलेपणा हे त्यामागे खरे कारण आहे. असंघटित क्षेत्रातील कोणत्याही कराराविना काम करणारे मुस्लिम मजुर 73 टक्के आहे. हातगाडी लावून व्यवसाय करणाऱ्या मुस्लिमांचे एकूण प्रमाण 51 टक्के आहे. रिक्शा ओढण्यात 48 टक्के आहे. त्यात ही भाड्याची रिक्षा चालविणारे 23 टक्के आहेत. 70 टक्के मुस्लिम महिला घरीच काम करतात. व 23 टक्के महिला मजूर कामात, भांडे धूणी, घरकाम कार्यरत आहेत.

मुस्लिमांना योग्य शिक्षण, तंत्रशिक्षण, व्यवसायिक शिक्षण, व अर्थसहाय्ययांची गरज आहे. हे वास्तव न्या. राजेंद्र सिंह सच्चर यांच्या अहवालात आले आहे. 10 टक्के मुस्लिमांची अवस्था सर्वसाधारण म्हणता येईल. मात्र 20 टक्के दारिद्री व 45 टक्के लोक हे दारिद्य्ररेषेखाली आहेत. या सर्वाच्या शैंक्षणिक आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाची मदत, योग्य नियोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी साठी आरक्षणाची नितांत गरज आहे. या सर्व मुद्यांची अत्यंत प्रभावीपणे जावेद पाशा यांनी मांडणी केली.

या प्रशिक्षण शिबरात विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, विधी, राजकीय क्षेत्रासह युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. प्रास्तविकात सय्यद वहाब यांनी मुस्लिीम आरक्षणाच्या संदर्भातील वाटचाल व आंदोलनाची माहिती दिली. प्रा. महेबुब सय्यद यांनी प्रा. जावेद पाशा यांच्या साहित्यिक, सामाजिक व आरक्षणाच्या चळवीचा परिचय करुन दिला. प्रशिक्षण शिबीराचे निमंत्रक युनुसभाई तांबटकर व राजु शेख यांनी पाहुण्याचे स्वागत केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी सय्यद अफझल, नईम सरदार, मुबीन शेख, फैय्याज केबलवाले, शेख शाकीर, आबीद हुसेन, साजीद शेख, फिरोज शेख, शफाकत सय्यद, जावेद शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले. सय्यद वहाब यांनी सुत्रसंचालन तर युनुसभाई तांबटकर यांनी आभार व्यक्त केले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages