Header Ads

 • Breaking News

  नगरमध्ये सव्वा दोन कोटींचा गुटखा पकडला


  अहमदनगर । DNA Live24 - नगरमध्ये एमआयडीसी परिसरात पोलिसांनी सव्वा दोन कोटी रुपयांचा गुटखा घेऊन जाणार मालट्रक पकडला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ही कामगिरी केली. एमआयडीसी परिसरातून केडगावकडे जाणाऱ्या बायपासला पोलिसांनी सापळा रचून हा ट्रक पकडला. 

  एमआयडीसी परिसरातून गुटखा घेऊन एक ट्रक जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजू वाघ, भरत डंगोरे, गणेश डहाळे, कोडम आदींच्या पथकाने सापळा रचला. एक ट्रक (क्र. एमपी ०९ एचजी ०८८९) पोलिसांनी अडवला. त्यामध्ये गुटख्याने भरलेली पोती पोलिसांना आढळून आली.

  याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे हेही घटनास्थळी दाखल झाले. नगरमधून गुटख्याची तस्करी होणे ही नवी बाब नव्हती. मात्र, आजवर पोलिसांनी कारवाई करण्यात स्वारस्य दाखवलेले नव्हते. या कारवाईत सुमारे सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. तपासणीसाठी पोलिसांनी अन्न औषध विभागालाही पाचारण केले होते. ताब्यात घेतलेल्या लोकांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad