Header Ads

 • Breaking News

  पत्रकार हल्ला विरोधी कायदा संमत करा, नगर प्रेस क्लबची मागणी


  अहमदनगर । DNA Live24 - मुंबई येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन, या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी व पत्रकार हल्ला विरोधी कायदा संमत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.

  झी 24 तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी स्वाती नाईक व व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप भारती मंगळवारी दिघा (नवी मुंबई) येथील न्यायालयाच्या आदेशाने इमारत पाडण्याच्या कामाचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. यांच्यावर काही गुंडांनी प्राणघातक भ्याड हल्ला केला. या वर्षात पत्रकारांना मारहाण झाल्याची ही ६९ वी घटना आहे. वास्तविक पत्रकार आपले काम पार पाडत असताना त्यांच्यावर प्राणघातल हल्ले होत आहे. या घटनेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने तीव शब्दात निषेध करण्यात आला.

  राज्य सरकार पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करत नसल्याने, पत्रकारांवर हल्ला होण्याच्या घटना वाढत आहे. वारंवार पत्रकारितेची गळचेपी होत असताना, तातडीने पत्रकार हल्ला विरोधी कायदा संमत करण्याची मागणी करण्यात आली. समितीचे जिल्हा निमंत्रक तथा प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महेश देशपांडे, अशोक झोटींग, आबिद दुलेखान, सुशिल थोरात, रमेश देशपांडे, जितेंद्र अग्रवाल, सचिन कलमदाणे, लैलेश बारगजे सहभागी झाले.

  यावेळी दिपक दरेकर, समीर मन्यार, इकबाल शेख, आमिर सय्यद, राजू खरपुडे, उमेर सय्यद, राजू शेख, निखील चौकर, बबलू शेख, साजिद शेख, मंदार साबळे, वाजिद शेख, श्रीकांत वंगारी, विक्रम बनकर, सागर शिंदे, जुनेद शेख, उमेश दारुणकर, शब्बीर सय्यद, शाहिद शेख, संतोष आवारे, सिध्दार्थ दिक्षीत, सरवर तांबटकर, संजय सावंत, यतिन कांबळे, दिपक कासवा, विजय मते, धनेश कटारीया आदिंसह पत्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व वृत्त छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad