728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नेवासा पंचायत समिती सभापतिपदी सुनिता गडाख यांची वर्णी ?

नेवासा (प्रतिनिधी) । DNA Live24 - पंचायत समितीच्या १४ पैकी १२ जागा जिंकत विरोधकांना गडाखांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने भुईसपाट केले. आता विकासकामांच्या माध्यमातून तालुक्यात विकासपर्व सुरु करण्याचा मानस कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत असून, नेवासा पंचायत समितीच्या सभापती पदावर सुनिताताई गडाख यांची वर्णी लावण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून बचत गट चळवळीच्या माध्यमातून सुनिता गडाख यांनी नेवाशात महिलांचे मोठे नेटवर्क उभे केले. त्यामुळे गोरगरीब जनतेची त्यांचा संबंध आला. आता पंचायत समितीच्या माध्यमातून गोरगरीबांसाठी विकासाची दारे उघडी करून देण्याचे आव्हान सुनिता गडाख यांच्यासमोर असणार आहे.

सुनिता ताई गडाख यांना सभापती करण्यासाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे उद्या (दि. १४) होणाऱ्र्या निवडीत सुनिताताई गडाख यांची निवड अंतिम मानली जात आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नेवासा पंचायत समिती सभापतिपदी सुनिता गडाख यांची वर्णी ? Rating: 5 Reviewed By: DNA Live24