Header Ads

 • Breaking News

  नेवासा नगरपंचायत : आजपासून सुधारित निवडणूक याद्यांचा कार्यक्रम

  नेवासे । DNA Live24 - ग्रामपंचायत बरखास्तीनंतर तब्बल १४ महिन्यांनी पुन्हा एकदा नेवासा नगरपंचायतीचा निवडणूक याद्या प्रसिद्धीचा सुधारित  कार्यक्रम आज (१० मार्च) लागणार आहे. १७ नोव्हेंबर २०१५ ला नेवासा नगरपंचायतीची स्थापनेचे आदेश निघाले. तेव्हापासून नगरसेवक पदासाठी इच्छुकांची धावपळ सुरु झाली. पण गेल्या १४ महिन्यात नगरपंचायतीसाठी खूप वेळा राजकीय कुरघोड्या झाल्या. आता त्यांना पुन्हा वेग येणार आहे.

  केवळ वृत्तपत्रात जाहिरात न दिल्याच्या मुद्यावरून ५ एप्रिल २०१६ ला ग्रामपंचायत स्थापन करण्याचे आदेश झाले. तीन महिने कोणाकडेच पदभार नव्हता. अखेर आंदोलने केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आदेशाने ग्रामपंचायत सदस्यांऐवजी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. या प्रशासकाने विशेष ग्रामसभा बोलावली. १० ऑगस्टला झालेल्या विशेष ग्रामसभेत एकमताने नगरपंचायतच व्हावी असा ठराव मंजूर करण्यात आला.

  पुन्हा एकदा ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच व सदस्यांकडे २६ ऑगस्टलाा सुपूर्द झाला होता. मात्र पुन्हा १५ दिवसात नगर पंचायत स्थापनेची अधिसूचना निघाली. आणि परत नगर पंचायत स्थापन झाली. तेव्हापासून सर्वांचे लक्ष निवडणुका कधी लागतात याकडे होते. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर ही उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. अखेर १० मार्च रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

  १६ तारखेपर्यंत हरकती सुचना दाखल करता येतील. १८ तारखेस अंतिम मतदार याद्या तयार होतील. अन २० तारखेला प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. नेवासा शहरात १७ प्रभाग असून नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे राजकीय हालचालींनाही आता चांगलाच वेग येणार आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad