728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ९ कोटी २५ लाख रुपये !

अहमदनगर । DNA Live24 - अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी ९ कोटी २५ लाख रुपये इतका निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, रस्त्यांचे रुंदीकरण, मोठ्या पुलांची दुरुस्ती ही कामे करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.

ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाने या कामांना मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांकडे नागरिकांनी रस्ते आणि पूल दुरुस्तीची कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील जामखेड तालुक्यातील देवदैठण, धामणगाव, सलगरवस्ती त्याचप्रमाणे वाकी ते खर्डा या मोठ्या रस्त्यांच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. कर्जत तालुक्यातील येरवडी ते पिंपळवाडी, कोंभर्ली ते चांदेखुर्द, मांडळी ते निमगाव गांगर्डा, राशीन ते परीटवाडी या मोठ्या रस्त्यांच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द ते खुणेगाव, गीडेगोलगाव रस्ता, राहुरी तालुक्यातील मुसळवाडी ते लाखचौकी रस्ता, मांजरी रस्ता, राहाता तालुक्यातील नांदुरखी ते केलवड आणि पिंप्री निर्मळ ते आडगाव रस्ता यालाही मंजुरी मिळाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव, खंडाळा आणि अशोकनगर हे रस्तेही होणार आहेत. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, कोळगाव खडी, कुंभारी, घाडी, चांदे, घसारे हा रस्ताही होणार आहे.

त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्यातील पिंपळे, मालदाड, निमवण आणि सोनेवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांनाही मंजुरी मिळाली आहे. अकोले तालुक्यातील वाशेरे, मांडवदरा, कळस, धामणगाव हे रस्तेही आता या निधीतून पूर्ण होणार आहेत. पारनेर तालुक्यातील करंदी रस्त्याच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, रुंदीकरण, अपघातप्रवण क्षेत्रांची सुधारणा करण्यात येणार असून कमकुवत पुलांची दुरुस्ती आणि मजबुतीकरण, लहान मोऱ्यांची सुधारणा या निधीतून करण्यात येईल.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ९ कोटी २५ लाख रुपये ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24