728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

शिवजयंतीला नगरमध्ये हिंदूराष्ट्र सेनेचा झंजावात !


अहमदनगर । DNA Live24 - येत्या १५ मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक हिंदुत्ववादी पक्ष, संघटना सरसावल्या आहेत. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही नगर शहरात हिंदुराष्ट्र सेनेचा झंजावात पहावयास मिळणार आहे.

शिवसेना, भाजप, मनसे यांच्यासह काही स्थानिक हिंदुत्ववादी संघटना दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. गेल्या वर्षी शिवसेनेने काढलेली मिरवणूक आकर्षक ठरली होती. मनसेच्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या ताब्यातील तरुण मंडळे चौकाचौकात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करतात. ढोल- ताशा सारख्या पारंपारिक वाद्यांसह तरुणांना डीजेचे मोठे आकर्षण असते. शिवसेना मिरवणूक दुपारी १ नंतर सुरु होण्याची शक्यता आहे. तर हिंदुराष्ट्र सेनेची मिरवणूक सायंकाळी ४ नंतर सुरु होईल.

माळीवाडा बसस्थानकाच्या शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकांना प्रारंभ होणार आहे. ढोल- ताशा, लेझीम, पथके यासह विविध प्रकारची साहसी प्रात्याक्षिके मिरवणुकी दरम्यान पहावयास मिळतील.

मागील तीन वर्षापासून शहरात हिंदुराष्ट्र सेनेतर्फे शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात येत आहे. नगर शहरातील सर्वात मोठी शिवजयंतीची मिरवणूक म्हणून हिंदुराष्ट्र सेनेची मिरवणूक ओळखली जाऊ लागली आहे. विशेषतः तरुण वर्ग यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी असतो. यावर्षी होणाऱ्या शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन हिंदुराष्ट्र सेनेच्यावतीने करण्यात येत आहे. हिंदू राष्ट्र सेनेच्या मिरवणुकीचे यंदाचे वैशिष्ठ्य म्हणजे भव्य सजविलेल्या रथात शिवरायांची मूर्ती असेल. हिंदू राष्ट्र सेनेचे खजिनदार तेजस धावडे यांचे निधन झाल्याने यंदा मिरवणूक शांततेत असणार आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त - नगर शहरात साजऱ्या होणाऱ्या या शिवजयंती उत्सवाच्या दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त शहरासह मिरवणूक मार्गावर तैनात केला जाणार आहे. 
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: शिवजयंतीला नगरमध्ये हिंदूराष्ट्र सेनेचा झंजावात ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24