728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सुरेगावातील कुक्कुटपालनाचे वायुप्रदुषण हरित न्यायाधिकरणात


अहमदनगर । DNA Live24 - कुक्कुटपालन केंद्रामुळे (पोल्ट्री फार्म) होणाऱ्या दुर्गंधीच्या त्रासाविरोधात नेवासे तालुक्यातील सुरेगाव (गंगापूर) ग्रामस्थांनी थेट हरित न्यायाधिकरणाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १७ एप्रिलला पुणे येथील हरित न्यायाधिकरण येथे होणार आहे. कुक्कुटपालन केंद्र व त्यामुळे होणाऱ्या वायु प्रदुषणाविरोधात प्रथमच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात कायदेशीर दृष्टीकोनातून अत्यंत मजबूत खटला दाखल करण्यात आला आहे.

सुरेगावात चेरॉन पोकलँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये कुक्कुटपालन व अंडीबीज उत्पादन व्यवसाय चालतो. कुक्कुटपालन केंद्रामुळे सतत गावकऱ्यांना दुर्गंधी सहन करावे लागते. कंपनीपासून ३ ते ४ मैल अंतरापर्यंत होणारे वायु प्रदुषण कोंबड्या मेल्यावर त्यांची विल्हेवाट लावण्याची सोय नसल्यामुळे ग्रामस्थंना त्रास होत आहे. माशा व डासांच्या वाढत्या त्रासामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

या पोल्ट्री फार्मच्या त्रासाला कंटाळून सुरेगाव ग्रामस्थांतर्फे बद्रीनाथ विश्वनाथ शिंदे यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये धाव घेत घेतली आहे. न्यायमूर्ती उमेश डी. साळवी व डॉ. अजय देशपांडे यांनी कुक्कुटपालन केंद्राद्वारे होणाऱ्या वायु प्रदुषणाची गंभीर दखल घेतली आहे. चेरॉन पोकोहँड लिमिटेड, या कुक्कुटपालन केंद्रासह महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, तलाठी तसेच महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग यांच्याविरुद्ध नोटिस जारी केली आहे.

केवळ सुरेगावचाच भाग नाही, तर या कुक्कुटपालन केंद्रामुळे भंडारदरा कमांड एरिया, पर्यावरण संवेदनशील विभाग, जायकवाडी धरण पट्टा व पक्षी सरंक्षित विभागसुद्धा धोक्यात आल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतून हे कुक्कुटपालन केंद्र त्वरीत बंद करावे, कुक्कुटपालन केंद्रामुळे खराब झालेली जमीन पूर्ववत करावी, हवेतील प्रदुषणासाठी चेरॉन कुक्कुटपालन केंद्राला दोषी धरावे व ५ लाख रुपये दंड ठोठावा, अशा मागण्या याचिकेतून करण्यात आल्या आहेत. - अॅड. असिम सरोदे, पुणे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सुरेगावातील कुक्कुटपालनाचे वायुप्रदुषण हरित न्यायाधिकरणात Rating: 5 Reviewed By: DNA Live24