728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

उपचारांअभावी दगावलेल्या पेन्शनधारकांना आयुक्तांच्या दालनासमोरच श्रध्दांजली

अहमदनगर । DNA Live24 - चार महिन्यांची थकित पेन्शन व इतर देयके तातडीने अदा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा नगरपालिका व महापालिका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने महापालिके समोर निदर्शने करण्यात आली. पैसे नसल्याने उपचारा अभावी निधन झालेल्या पेन्शन धारकांना आयुक्तांच्या दालना बाहेर श्रध्दांजली वाहून, आयुक्त दिलीप गावडे यांना निवेदन देण्यात आले.

गावडे यांनी मार्च आखेरची कर वसुली करुन व एलबिटी निधीच्या माध्यमातून थकित पेन्शन तातडीने अदा करण्याचे आश्‍वासन दिले. पेन्शन न मिळाल्यास मंगळवारी (७ मार्चला) महापालिकेत उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. थकित पेन्शन मिळण्यासाठी महापालिके समोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.

तसेच औषध खर्चासाठी पैसे नसल्याने उपचारा अभावी निधन झालेले पेन्शनर श्रीकांत गोफणे, चंदन वाणे, सिता आपटे, मोहंमद पठाण, लीला वाघमारे, उषा खरारे यांना आयुक्तांच्या दालनाबाहेर संघटनेच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

सेवानिवृत्त झालेल्या मनपा कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर 2016 पासून अद्यापि पेन्शन व इतर देयके न दिल्याने पेन्शन धारकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात महापालिकेस वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील प्रशासनाकडून पेन्शन देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या आंदोलनात एन. एम. पवळे, आर. के. गावडे, आर. जी. शेख, व्ही. एस. देवचक्के, कांतीलाल वर्मा, वसंत थोरात, ज्ञानेश्‍वर धिरडे, डी. एल. खांडेकर, डी. यू. देशमुख, मंगल साळुंके, रमेश सपाटे, स्नेहल कुलकर्णी, सुनंदा देशमुख, रमेश गायकवाड, युनूस सय्यद आदिंसह सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: उपचारांअभावी दगावलेल्या पेन्शनधारकांना आयुक्तांच्या दालनासमोरच श्रध्दांजली Rating: 5 Reviewed By: DNA Live24