Header Ads

 • Breaking News

  नोटा बदलीत पोलिसांचा सहभाग?

  पुणे । DNA Live24 - पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या रॅकेटमध्ये पोलिसांच्या सहभागाने खळबळ उडाली आहे.

  जुन्या नोटा बदलून देण्यारं रॅकेट पुण्याच्या कोथरुडमध्ये उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये कोथरुड पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप आहे.

  कोथरुड पोलिस ठाण्यातील पोलीस उप-निरीक्षक विक्रम राजपूत, पोलिस कॉन्स्टेबल हेमंत हेंद्रे यांच्यासह आणखी तीन कॉन्स्टेबल अशा एकूण 5 जणांविरुध्द चौकशी सुरु करण्यात आली आहे. या पाच जणांनी पुण्यातील व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये बदलून दिल्याचा आरोप आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad