Header Ads

  • Breaking News

    रेल्वे स्टेशन परिसरातील अस्वच्छतेची प्रतिमा पुसणार - गव्हाळे

    अहमदनगर । DNA Live24 - प्रभाग क्रमांक 28 तील रेल्वे स्टेशन येथील स्वामी समर्थ कॉलनीत (मार्कंडेय मार्ग) बंदपाईप गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक विकास इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. लवकरच येथील रस्त्यांचे व पाणीपुरवठा फेज-2 चे काम कार्यान्वित करण्याचे आश्‍वासन नगरसेवक विजय गव्हाळे यांनी दिले.

    यावेळी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी पवार, सुर्यकांत भोसले, भाऊसाहेब चौधरी, हबीब शेख, विजय जाधव, आप्पा बारशीकर, राजू लंगोटे, नाना गोसावी, नाना दळवी, सुवर्णा शिंदे, वसुधरा इनामदार, आशा जाधव, नंदा क्षत्रीय, विमल रोकडे, बसापुरे, अग्रवाल, मुथा, भिसे आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    विजय गव्हाळे म्हणाले, प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. प्रभागाचा विकास करुन, रेल्वे स्टेशन परिसरातील अस्वच्छतेची प्रतिमा पुसणार आहे. विकास हे ध्येय समोर ठेवून कार्य चालू असून, प्रभागात सुशोभीकरणाचे कामही लवकर सुरु केले जाणार आहे. बंदपाईप गटारीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Top Ad

    Post Bottom Ad