Header Ads

 • Breaking News

  साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल राजेंद्र सरग यांचा गौरव

  अहमदनगर । DNA Live24 - महाराष्ट्र साहित्य परिषदेची अहमदनगर शाखा आणि जिल्हा वाचनालयाच्या वतीने व्यंगचित्रकार तथा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा साहित्य क्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल प्रा. खासेराव शितोळे यांच्‍या हस्ते गौरव करण्यात आला.

  मराठी राजभाषा गौरव दिनी झालेल्‍या कार्यक्रमास कवी तहसीलदार गणेश मरकड, मसापचे अध्यक्ष अनिरूध्द देवचक्के, कार्याध्यक्ष किशोर मरकड, शिल्पा रसाळ, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, उपाध्यक्ष अजित रेखी, सहकार्यवाह उदय काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी तहसिलदार गणेश मरकड यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास तर राजेंद्र सरग यांच्या हस्ते कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास परिषदेचे कार्यवाह गणेश भगत, वाचनालयाचे संचालक दिलीप पांढरे, किरण अग्रवाल, भालचंद्र आपटे, नंदकिशोर आढाव, गणेश आष्टेकर व साहित्य रसिक उपस्थित होते.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad