Header Ads

 • Breaking News

  न्यू इंग्लिश स्कूलचे उपशिक्षक ए. एल. शिंदे सेवानि़वृत्त


  अहमदनगर । DNA Live24 - चिचोंडी पाटील येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक ए. एल. शिंदे यांनी आजवर शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान प्रेरणादायी आहे, असे खंडेराव ठोंबरे यांनी व्यक्त केले. उपशिक्षक शिंदे यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच उत्साहात पार पहला. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय उपनिरीक्षक सी. बी. खंडागळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते. महाविद्यालयाच्या सर्व स्टाफच्या वतीने ए एल शिंदे व आशा शिंदे यांचा वस्त्र, शाल, श्रीफळ व स्मतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

  या वेळी ऩगर पंचायत समितिच्या उपसभापती कांताबाई कोकाटे, सरपंच अर्चना चौधरी, उपसरपंच शरद पवार, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद डॉ मनोहर करांडे, स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष खंडेराव ठोंबरे, प्राचार्य बी. ई. गायकवाड़, मुख्याध्यापक प्रकाश ठोंबरे, माध्यमिक शिक्षक बंकेचे संचालक कल्याण ठोंबरे, सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोकाटे, इंजिनिअर प्रविण कोकाटे, अड लक्ष्मण हजारे, अप्पासाहेब पवार उपस्थित होते.

  प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर आण्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आठवीच्या विद्यार्थिनीनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. कोकाटे यांनी केले. या वेळी शिक्षक प्रतिनिधी अर्चना तांदळे, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे, प्राचार्य गायकवाड़, सरपंच अर्चना चौधरी, उपसरपंच शरद पवार, प्रकाश ठोंबरे, प्रवीण कोकाटे, कल्याण ठोंबरे आदीसह विविध मान्यवरांनी शिंदे पतिपत्नींना शुभेच्छा दिल्या.

  यावेळी पर्यवेक्षक पानसंबळ सर, पोपट घोड़के आदींसह मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एल. धस  व एस. यु. मुठे केले. तर आभार पी. वाय. मोरे यांनी मानले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad