Header Ads

 • Breaking News

  घोड़ेगावात शिवजयंती उत्साहात साजरी


  घोडेगाव । DNA Live24 (दिलीप शिंदे) - नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अश्वरथावर छत्रपतींची सिंहासनाधिष्ठीत मूर्तीची मिरवणुक काढन्यात आली अनेक मान्यवरांनी व नागरिकांनी छत्रपतींच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

  सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत कार्यालया समोर प्रथम शिवाजी महाराजाचे पुतळयाला पुष्पहार करण्यात आला. सकाळी नऊ वाजता शिवसेना शाखेच्या वतिनेही छत्रपतीच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

  सायंकाळी पाच वाजता सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिति घोडेगावचे वतीने शनि चौकातून अश्वरथावर छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणुक काढण्यात आली. यावेळी रस्त्याचे दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले होते. " जय भवानी जय शिवराय "  घोषणेने वातावरणात व नागरिकांत चैतन्य निर्माण झाले. रात्री नऊ पर्यंत मिरवणुक चालु होती .
  प्रथमच भव्य मिरवणुक, भगवे फेटे, शोभेची दारु, बैंड पथक, पोवाडे गायन, नाचणारे घोड़े, घोषणांनी गावात चैतन्य निर्माण झाले. मिरवणुकीत सर्व धर्मियांनी उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणुकीच्या निमित्ताने घोडेगावातील जातीय सलोख्याचे दर्शन घडले .


  युवकांनी छत्रपती शिवजयंती उत्सव चांगल्या प्रकारे साजरा केल्याने घोडेगावातील नागरिकांचे वतीने उत्सव समितीचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad