728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

देवकी भापकर ठरल्या 'स्मार्ट श्रीमती २०१७'च्या मानकरी


अहमदनगर । DNA Live24 - जागृती बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे स्टेशन रोडवरील विरंगुळा मैदान येथे नुकतेच महिला मेळावा घेण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या मेळाव्या महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या 'स्मार्ट श्रीमती २०१७' स्पर्धेत विजेतेपदाच्या मानकरी देवकी भापकर ठरल्या. यावेळी व्यासपीठावर महिला व बालकल्याण अधिकारी विजया माने, नगरसेविका सुवर्णा जाधव आणि संस्थेच्या अध्यक्षा मंगल भुजबळ या होत्या.

महिला मेळाव्यात महिला व बालकल्याण अधिकारी विजया माने म्हणाल्या, सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने उत्कृष्ट दर्जाचे काम करीत आहेत. पुरुषांप्रमाणेच महिलांचा विविध क्षेत्रामध्ये वाढत असलेला सहभाग ही महिलांसाठी आनंददायी गोष्ट आहे. महिलांनी आपले आरोग्य निरोगी ठेवून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासोबतच सामाजिक कार्यात योगदान दिले पाहिजे. यावेळी संध्या रासकर, निलिमा शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंगल भुजबळ म्हणाल्या, संस्था वर्षभर विविध उपक्रम राबवत असते. महिलांचा समाजकारणातला जास्तीत जास्त सहभाग वाढावा, म्हणून संस्था नेहमी प्रयत्नशील असते. अधिक युवक-युवती महिलांना संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याचा मानस देण्याचा संस्थेचा मानस आहे. आज महिला इंदिरा गांधी, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, सानिया मिर्झा, लता मंगेशकर यांचा आदर्श ठेवून उंच भरारी घेत आत्मविश्वासाने वावरत आहेत.

नगरसेविका सुवर्णा जाधव म्हणाल्या, महिलांनी महिलांमध्ये असलेला द्वेष कमी करुन एकमेकींना समजावून घेऊन सामाजिक क्षेत्रात योगदान द्यावे. घरामध्ये सासू व सुनेने हसतमुख रहावे. जर सासू सुनेचे नाते चांगले निर्माण झाले तर घरामध्ये वातावरण प्रसन्न राहते. हसा आणि सुंदर दिसा, हा महत्वपूर्ण सल्ला त्यांनी यावेळी महिलांना दिला. परिसरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलिमा शिंदे यंानी केले. आभार शारदा तांबे यांनी मानले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: देवकी भापकर ठरल्या 'स्मार्ट श्रीमती २०१७'च्या मानकरी Rating: 5 Reviewed By: DNA Live24