728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंना भाजप प्रवेशाची खुली ऑफर !

मुंबई । DNA Live24 - राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौफेर फटकेबाजी केली. विरोधकांचा गोंधळ सुरु असताना मुनगंटीवार यांनी थेट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाच भाजपमध्ये येण्याची थेट ऑफर देऊन टाकली. तर दुसरीकडे काँग्रेस नेते दिलीप वळसे पाटील यांची नार्को टेस्ट केल्यास ते कोणा सोबत आहेत, हे स्पष्ट होईल, असे सांगून अनेकांना धक्का दिला.

मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी विरोधकांकडून कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन जोरदार गोंधळ सुरु होता. सत्ताधारी भाजपविरोधात विरोधी पक्षांने घोषणाबाजी सुरु होती. हे पाहून अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना विरोधकांनाच चिमटे काढण्यास सुरुवात केली.


अर्थमंत्री विखेंना उद्देशून म्हणाले की, ”विखे तुम्ही आमच्याकडे या आणि पावन व्हा, आणि म्हणा, नमामी चंद्रभागा.” विखेंना ही खुली ऑफर दिल्याने सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला. पण मुनगंटीवार इतक्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी दिलीप वळसे पाटील यांचीही पंचाईत केली.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंना भाजप प्रवेशाची खुली ऑफर ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24